‘नीट’ गोंधळाविरोधात ‘आप’ देशभर आंदोलन करणार : संदीप पाठक

‘नीट’ गोंधळाविरोधात ‘आप’ देशभर आंदोलन करणार : संदीप पाठक

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : नीट परीक्षा गोंधळावरुन आम आदमी पक्षाच्या वतीने बुधवारी १९ जून रोजी देशभरात निदर्शने केली जाणार आहेत. आपचे नेते संदीप पाठक यांनी एक्सवर पोस्ट करून ही माहिती दिली.

या आंदोलनात आपचे कार्यकर्ते विविध राज्यांमध्ये मोदी सरकारविरोधात निदर्शने करतील. त्यापूर्वी १८ जून रोजी आम आदमी पक्षाचे सर्व खासदार, आमदार व नगरसेवक दिल्लीतील जंतरमंतरवर निदर्शने करणार असल्याचे पाठक यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news