नागपूर, रामटेक लोकसभा मतमोजणीसाठी कळमना मार्केट सज्ज | पुढारी

नागपूर, रामटेक लोकसभा मतमोजणीसाठी कळमना मार्केट सज्ज

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : नागपूर व रामटेक लोकसभा निवडणुकीच्या ४ जून रोजी होणाऱ्या मतमोजणीसाठी कळमना मार्केट परिसर सज्ज झाला आहे. दरम्यान, व्यापाऱ्यांनी शुक्रवारी (दि.२४) काहीसा विरोध केल्याने वातावरण तापले. दुसरीकडे कळमना मार्केटमधील व्यापाऱ्यांच्या व्यवसायाला आजवर कोणतीही बाधा येऊ न देता मतमोजणीच्या कामाची व्यवस्था व कामे पूर्ण करण्यावर भर दिला, असा दावा जिल्हा प्रशासनाने केला.

जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी शुक्रवारी (दि.२४) प्रत्यक्ष कळमना मार्केटला भेट देऊन व्यापाऱ्यांशी संवाद साधत मतमोजणी केंद्रांची पाहणी व सुरक्षिततेचा आढावा घेतला. अप्पर जिल्हाधिकारी तथा रामटेक निवडणूक निर्णय अधिकारी तुषार ठोंबरे, निवासी उपजिल्हाधिकारी अनूप खांडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रविण महिरे, उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे, वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

मतमोजणीत प्रारंभी पोस्टल बेलॅटची मतमोजणी होणार आहे. ५०० बॅलेट पेपरसाठी एक टेबल याप्रमाणे १० टेबलवर १० अधिकारी राहणार आहेत. नागपूर लोकसभेसाठी १२० टेबल व रामटेकसाठी १२० टेबल या प्रमाणे मतमोजणीची रचना करण्यात आली आहे. राजकीय प्रतिनिधींना प्रत्यक्ष मतमोजणी प्रक्रिया पाहता येईल. दोन्ही लोकसभा मतदार संघासाठी एकूण सुमारे सहा हजार एवढे मनुष्यबळ कार्यरत राहणार आहे.

हेही वाचा : 

 

Back to top button