नागपूर : आई वडिलांना मारहाण केल्याच्या रागातून लहान भावाचा निर्घृण खून | पुढारी

नागपूर : आई वडिलांना मारहाण केल्याच्या रागातून लहान भावाचा निर्घृण खून

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : शहरातील तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टिमकी परिसरात रविवारी (दि.२८) धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आई -वडिलांना मारहाण केल्याचा राग मनात धरून मोठ्या भावाने लहान भावाचा निर्घृण खून केला. गौरव गोखे असे खून झालेल्या तरूणाचे नाव असून याप्रकरणी दिलीप गोखे याला अटक करण्यात आली आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी, मृत गौरवला दारूचे व्यसन होते. तो दररोज दारू पिऊन आई -वडिलांबरोबर वाद घालत होता. काल रविवारी (दि.२८) त्याने दारू पिण्यासाठी पैशापोटी आई -वडिलांना मारहाण केली. याचा राग मनात धरून संतापलेल्या दिलीप या मोठ्या भावाने गौरवच्या गळ्यावर धारदार चाकूने वार केल्याने गौरवचा रक्तस्राव होऊन जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच तहसील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दिलीपला अटक केली.

हेही वाचा : 

Back to top button