महाराष्ट्रात फक्त माझं नाणं चालणार ही उद्धव ठाकरेंची अहंकारी भाषा : चंद्रशेखर बावनकुळे | पुढारी

महाराष्ट्रात फक्त माझं नाणं चालणार ही उद्धव ठाकरेंची अहंकारी भाषा : चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : उद्धव ठाकरेंनी लोकलमध्ये मुंबईकरांशी चर्चा केली असती, तरी ‘मोदी की गॅरंटी‘ या नाण्याचा खणखणीत आवाज आला असता. महाराष्ट्रात फक्त माझं नाणं चालणार, ही उद्धव ठाकरेंची अहंकाराची भाषा असून देशातील जनतेचा पंतप्रधान मोदी यांच्यावर विश्वास आहे. महाराष्ट्रातही ‘मोदी की गॅरंटी‘च चालणार, असा दावा करत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विटरवरून उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

बावनकुळे पुढे म्हणाले, उद्धव ठाकरेंचं नाणं खोटं आहे, हे महाराष्ट्रातील जनतेने अडीच वर्षाच्या सत्तेच्या काळात बघितले आहे. महाराष्ट्रात फक्त माझं नाणं चालणार, असं सांगून उद्धव ठाकरेंनी काँग्रेसलाही ‘कवडीमोल‘ केलं आहे. हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मोठ्या कष्टाने शिवसेनेच्या नाण्याला सुवर्ण झळाळी मिळवून दिली. पण तुम्ही सोनिया गांधींची गुलामी स्वीकारून तुमच्या नाण्याची गारगोटी करून घेतली, असा टोलाही बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंना ट्विटरवरून लगावला.

हेही वाचा :

Back to top button