नागपूर : कर्ज घेऊन चाललाय भाजपचा दिवाळी सण : नाना पटोले | पुढारी

नागपूर : कर्ज घेऊन चाललाय भाजपचा दिवाळी सण : नाना पटोले

नागपूर ; पुढारी वृत्‍तसेवा सरळसरळ कोट्यवधी रुपयांचे कर्ज घेऊन दिवाळी सण साजरा करण्याचा प्रयत्न भाजपचे सरकार करत आहे, हे स्पष्ट आहे. समृद्धी महामार्गासाठी 75 हजार कोटी कर्ज घेतले आहे. देशात आणि राज्याच्या जनतेवर कर्ज वाढवणे, विकासाच्या नावावर प्रकल्प लुटण्याचे काम सुरू आहे. समृद्धी मार्गावर रोज अपघात होत आहेत. कोट्यवधी रुपये त्या लोकांचे रुग्णालयात खर्च होत आहेत. रस्ते मारण्यासाठी नाही तर सुविधांसाठी असतात. जनतेच्या नावाने ही सगळी लूटपाट सुरू असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माध्यमांशी बोलताना केला.

महायुतीची अवस्था बिकट आहे. परवा एक कार्टून पाहत होतो. ते अमित शहा हे सोफ्यावर झोपलेले आहेत, काठावर एकनाथ शिंदे बसलेले आहेत, अजित पवार काठाच्या बाहेर चालले आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदेच्या सेनेची काय हालत होईल आणि कार्यकर्ते कसे सांभाळायचे असे चित्र आहे. मंत्रिमंडळात समावेश होण्याच्या आशेने भाजपचे नेते बाशिंग बांधून होते. बाहेरून आलेल्यांना मंत्रिमंडळात स्थान दिलं. त्यामुळे पूर्ण जागा भाजपने कव्हर केली आणि यांना कोपऱ्यात टाकलं, असं ते कार्टून होते.

पटोले यांनी सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारी बाबतीत बोलणे टाळले. ते सर्व पवार हे कुटुंबीय आहेत. काका पुतण्याचं भांडण असो की, एकमेकांची गळाभेट ते चालत राहते असेही ते म्हणाले. 6 तारखेला आमची मविआत निवडणूक संदर्भात चर्चा झाल्यानंतर त्याचा सगळ्या रिपोर्ट माझ्याकडे आहे. काल महाशिवरात्री यात्रेनिमित्त मी मतदारसंघात गेलो होतो. आज मुंबईला जात आहे. काय प्रगती आहे, आज मला कळेल. ॲड प्रकाश आंबेडकरांवर मला काही प्रतिक्रिया द्यायची नाही.

संजय निरूपम यांची टीका यासंदर्भात बोलताना मुंबईतील राजकीय घडामोडीबद्दल मला माहिती नाही. वर्षा गायकवाड संघटनात्मक काम पाहतात असे स्पष्ट केले.

हेही वाचा :

Back to top button