Vijay Wadettiwar : विरोध करणाऱ्याला आडवे करा: विजय वडेट्टीवार

file photo
file photo

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : मराठा समाजाला फसवण्याचे काम सरकारने केले आहे. हे लपून राहिलेले नाही. जुन्या चुका परत करून समाजाला न टिकणारे आरक्षण दिले, अशी मराठा समाजाची खात्री झाली आहे. हा रोष समाजाचा सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आहे, असे विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. ते पत्रकारांशी आज (दि.३) बोलत होते. Vijay Wadettiwar

आमची मराठा समाजाला विनंती आहे की, असे उमेदवार उभे करण्यापेक्षा जो मराठा समाजासाठी आडवा येतोय, त्याला आडवा करण्यासाठी निवडणुकीत मतदान करा. उमेदवार उभे करणे, मनातील राग काढण्यासाठी, लोकशाहीसाठी योग्य राहणार नाही, असे मला वाटते. महाराष्ट्राची भाजपची यादी यासाठी तयार होत नाही की, शिंदे व अजित पवार यांना आता दोन-दोन जागा द्यायच्या की तीन-तीन जागा द्यायच्या की जास्तीत जास्त चार द्यायच्या. यावर अजून फायनल झालेले नाही. चार-चार जागा फायनल होतील, त्यावेळेस मला वाटते, महाराष्ट्रातील यादी जाहीर होईल. Vijay Wadettiwar

अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्याशी आमची चर्चा झाली आहे, दोन दिवसांत तीनही पक्ष प्रकाश आंबेडकर यांच्याशी बोलतील पाच किंवा सहा तारखेपर्यंत हा तिढा पूर्णत सुटेलेला दिसेल. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यासंदर्भात छेडले असता नुकतेच पंतप्रधान येऊन गेले. त्यावेळी अर्ध्या खुर्च्या रिकाम्या होत्या. भाषण सुरू असताना महिला उठून जात होत्या. त्यामुळे आता भाजपची विश्वासार्हता कुठे आहे? वैदर्भीय जनता काँग्रेसच्या पाठीमागे शंभर टक्के उभे राहणार आहे, असा दावा वडेट्टीवार यांनी केला.

पक्षाच्या कार्यक्रमाला जेवढ्या गाड्या लावतील, तेवढे लोक जास्त येतील. पण गाड्या लावून आणि गाडीत बसवून खाण्यापिण्याची सोय करून लोक आलेले लोक काही पक्षाबरोबर उभे राहतात, असा आमचा अनुभव नाही. आमदार संजय गायकवाड प्रकरणी कारवाई करणे पोलिसाचे काम आहे. सरकार कुणावर कारवाई करते, बेताल वक्तव्य करणाऱ्यांवर कारवाई करते का? गुंडाला संरक्षण देणाऱ्यांवर कारवाई करते का? असा आरोप वडेट्टीवार यांनी केला.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news