नागपूर: महावितरणच्या कार्यालयासमोर कंत्राटी कामगारांचे आंदोलन | पुढारी

नागपूर: महावितरणच्या कार्यालयासमोर कंत्राटी कामगारांचे आंदोलन

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटनेकडून आज (दि.२१)  राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले. कंत्राटी कामगारांना कायम कर्मचाऱ्यांप्रमाणे ३ टक्के पगार वाढ देण्यात यावी. कंत्राटी कामगारांना शाश्वत रोजगाराची हमी देण्यात यावी, अशा विविध मागण्यांसह नागपूर येथील काटोल रोडवरील मुख्य अभियंता नागपूर परिमंडळ कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.

मागण्या पूर्ण न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा या कामगारांकडून देण्यात आला आहे. कुणाल जिचकार, कंत्राटी कामगार संघ विदर्भ सचिव यांच्या नेतृत्वात यावेळी मोठ्या प्रमाणात कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले होते. कर्मचाऱ्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

हेही वाचा 

Back to top button