नागपूर : विशाखापट्टणम येथून आलेल्‍या ५० किलो गांजासह २ जणांना अटक | पुढारी

नागपूर : विशाखापट्टणम येथून आलेल्‍या ५० किलो गांजासह २ जणांना अटक

नागपूर ; पुढारी वृत्‍तसेवा होळी धुळवडीच्या निमित्ताने चढ्या दराने गांजाची विक्री केली जाते. शेजारच्या मध्यप्रदेश राज्‍यामधून मोठ्या प्रमाणात गांजा येतो. आता विशाखापट्टणम येथुन आलेला 50 किलो गांजा शहर पोलिसांनी पकडला आहे. मेट्रोसिटीमध्ये विक्री करण्यासाठी कारमधून गांजा तस्करी करणाऱ्या उत्तरप्रदेशातील दोघांना शहर गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थविरोधी पथकाने बेड्या ठोकल्या आहेत.

बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वर्धा मार्गावर ही कारवाई करण्यात आली. यशपाल चव्हाण आणि अंकित श्यामवीर सिंग अशी या दोन्ही संशयीत आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी संशयीत आरोपींच्या ताब्यातून 50 किलो गांजासह 17 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. नागपूर गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थविरोधी पथकाला विशाखापट्टणम येथून एका कारमधून गांजाची वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती मिळली. त्याआधारे पोलिसांनी बेलतरोडी परिसरातील वर्धा मार्गावर सापळा रचला व या कारला थांबवून त्याची झडती घेतली. त्यामध्ये गांजा सापडला आहे. पोलिसांनी संशयीत आरोपींकडून 50 किलो गांजासह एक कार आणि दोन मोबाइल असा एकूण 17 लाख 71 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती सहाय्यक पोलिस आयुक्त अभिजित पाटील यांनी दिली.

हेही वाचा : 

 

Back to top button