नागपूर : मराठा आरक्षण निर्णयाचे सकल मराठा समाजाकडून स्वागत | पुढारी

नागपूर : मराठा आरक्षण निर्णयाचे सकल मराठा समाजाकडून स्वागत

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : राज्य विधिमंडळात आज (दि.२०) एकमताने मराठा आरक्षणाचे विधेयक मंजूर करण्यात आले. परंतु, मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील हे आंदोलनावर ठाम आहेत. तर दुसरीकडे नागपुरात सकल मराठा समाजाने महाल गांधीगेट परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करीत, फटाक्यांच्या आतषबाजी, एक मराठा, लाख मराठा घोषणाबाजीसह जल्लोषात स्वागत करण्यात आले.

मागील अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी राज्य सरकारने आरक्षणात १० टक्के वाटा देऊन पूर्ण केली. मराठा आरक्षणावर दिलेल्या निर्णयाचे सकल मराठा समाजाने फटाके फोडून जल्लोष करत सरकारचे अभिनंदन केले. राज्य सरकारने विशेष अधिवेशनात विधेयकाला मंजुरी दिल्याने आम्ही समाधानी आहोत, आपली कोणतीही फसवणूक झाली नसल्याची भावना सकल मराठा समाजाच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे.

त्यामुळे एकीकडे मनोज जरांगे हे सगेसोयरे आणि सरसकट ओबीसींतून आरक्षण देण्याच्या मागणीवर ठाम असताना दुसरीकडे मात्र सरकारने केलेल्या कायद्याबद्दल मराठा समाजाने जल्लोष करून आनंद व्यक्त केला आहे. यावेळी नरेंदें मोहिते, परीक्षित मोहिते यांच्यासह सकल मराठा समाज पदाधिकारी, कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.

हेही वाचा 

Back to top button