Babanrao Taiwade : निवडणुका न घेण्याची मागणी हास्यास्पद: डॉ. बबनराव तायवाडे | पुढारी

Babanrao Taiwade : निवडणुका न घेण्याची मागणी हास्यास्पद: डॉ. बबनराव तायवाडे

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची निवडणुका न घेण्याची मागणी हास्यास्पदच आहे. निवडणूक देशाची आहे. एखाद्या समूहाच्या मागणीने निवडणुका थांबवता येत नाहीत. आंदोलनात गावात आलेल्या गाड्या जप्त करा, नेत्यांना गावबंदी करा, वृद्धांना आंदोलनात उतरवा असे म्हणणे योग्य नाही.अशा आंदोलनामुळे समाजात संघर्ष निर्माण झाल्यावर कोण जबाबदार राहणार? असा सवाल ओबीसी नेते डॉ. बबनराव तायवाडे यांनी केला. आज (दि.२१) ते माध्यमांशी बोलत होते. Babanrao Taiwade

राज्य सरकारचे ओबीसी समाजाकडून आभार मानतो. ओबीसी आरक्षणाला धक्का लावणार नाही, या शब्दांवर सरकार कायम राहिले. प्रशासनाला प्रक्रिया करण्यासाठी वेळ दिला पाहिजे. मनोज जरांगे मोठे आंदोलन उभारणार, असा इशारा देत आहेत. मात्र, सध्या बारावीची परीक्षा सुरू आहे. लोकांना त्रास होऊ नये, याची काळजी आंदोलकांनी घेतली पाहिजे. आता जरांगे आणि भुजबळ यांच्या एकमेकांच्या वक्तव्याची सवय झाली आहे. दोघेही एकमेकांवर आक्रमकपणे टीका करतात, असे ते म्हणाले. Babanrao Taiwade

हेही वाचा 

Back to top button