नागपूर: प्रेम प्रकरणातून मारहाण करणाऱ्या एकाला अटक | पुढारी

नागपूर: प्रेम प्रकरणातून मारहाण करणाऱ्या एकाला अटक

नागपूर, पुढारी वृत्तसेवा: मित्राचा प्रेम प्रकरणाचा वाद मिटविण्यास गेलेल्या एका तरुणाला जीवे मारण्याच्या उद्देशाने धारधार शस्त्राने जखमी केल्याची तक्रार पाचपावली पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे. आरोपी रोहित नाहरकर यांच्या मेहुणीचे आशिष बडल यांच्याशी अनेक दिवसापासून प्रेमसंबंध सूरू होते. मात्र, आशिष बडल हा सदर मुलीसोबत लग्न करण्यासाठी टाळाटाळ करत होता.

अभिषेकला या प्रकरणाची माहिती होती म्हणून दोघांमधील असलेला वाद मिटवण्याच्या उद्देशाने रात्री ठरविलेल्या घटनास्थळी तो भेटायला गेला. यावेळी आरोपी आशिष नाहरकर, शाम कुसरे, राजकुमार लासवार यांच्यासोबत अभिषेकचे वादविवाद झाले. हा वाद एवढा विकोपाला गेला की, आरोपीने अभिषेकवर विटा व तलवारीने मानेवर वार करुन गंभीर जखमी करीत घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेची पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठत अभिषेक यास तत्परतेने जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल केले.

अभिषेकची प्रकृती आता ठीक आहे. सदरील आरोपीला पोलिसांनी अटक करुन विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद सोनवणे यांनी दिली.

हेही वाचा 

Back to top button