काँग्रेसमधील मोठे नेते भाजपच्या संपर्कात : चंद्रशेखर बावनकुळे | पुढारी

काँग्रेसमधील मोठे नेते भाजपच्या संपर्कात : चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर ; पुढारी वृत्‍तसेवा मी यापूर्वी अनेकवेळा सांगितले आहे की, काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद सुरू आहेत. समन्वय घडविण्यासाठी काँग्रेस समर्थ नाही. अंतर्गत धुसफूस सुरू आहे. काँग्रेसमधील आणखी मोठे नेते भाजपाच्या संपर्कात आहेत. काँग्रेसमध्ये मोठी अस्वस्थता असल्याचा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना केला. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या काँग्रेसच्या राजीनाम्याबाबत ते बोलत होते.

अशोक चव्हाण राज्यसभा मिळणार याबाबत छेडले असता माझ्याकडे आतापर्यंत कुठलाही प्रस्ताव नाही.काहीही बोलणे झाले नाही, माझ्याकडे असा कुठलाही प्रस्ताव नाही. मात्र, आमच्याकडे कुठल्याही पक्ष प्रवेशाचा फायदा होतो. प्रत्येकाची क्षमता आहे, त्याचा फायदा होईल. मोदींचे वादळ जेव्हा महाराष्ट्रात येतील तसे अनेकांचे पक्ष प्रवेश होतील. जनतेला मोदींच्या गॅरंटीवर विश्वास आहे.

राज्यसभेची आम्हाला तयारी करण्याची गरज नाही. मीडियाने पंकजा मुंडेंना फिरवून दाखवले, त्या विधान मंडळात नाही म्हणून त्यांनी सहज वक्तव्य केले. त्या आमच्या नेत्या आहेत. त्यांच्याबाबत केंद्रीय वरिष्ठ योग्य निर्णय घेतील. दोन दिवसांतील अवकाळी पावसासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आलो. मदत मिळालीच पाहिजे. सोयाबीन आणि कापसाला योग्य भाव मिळाला पाहिजे याकडे चंद्रशेखर बावनकुळे यांनी लक्ष वेधले.

हेही वाचा :

Back to top button