नागपूर रामटेक लोकसभा मतदारसंघावर शरद पवार गटाचा दावा | पुढारी

नागपूर रामटेक लोकसभा मतदारसंघावर शरद पवार गटाचा दावा

नागपूर; पुढारी वृत्तसेवा :  नागपूर जिल्ह्यातील रामटेक लोकसभा मतदार संघासाठी माजी आमदार प्रकाश गजभिये यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे उमेदवारी द्यावी, असा एकमताने ठराव शुक्रवारी (दि.९) रविभवन येथील कार्यकारिणीच्या बैठकीत मंजूर झाला. माजी आमदार प्रकाश गजभिये यांचा रामटेक लोकसभेच्या उमेदवारीचा प्रस्ताव प्रदेश प्रवक्ते प्रवीण कुंटे- पाटील यांनी ठेवला तर नागपूरचे जिल्हाध्यक्ष राजूभाऊ राऊत व अविनाश गोतमारे यांनी या प्रस्तावाचे समर्थन केले. कार्यकर्त्यांनीही या प्रस्तावाचे स्वागत केले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते जिल्हा परिषद सदस्य सलिल देशमुख हे या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. वाडी नगर पंचायतचे सदस्य शाम मंडपे, कुही येथील ग्रामपंचायत सदस्य आशिष आवळे, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा अध्यक्ष संतोष नरवाडे, सावनेर तालुका अध्यक्ष कपिल वानखेडे, युवक कार्याध्यक्ष शैलेंद्र तिवारी व नागपूर विद्यार्थी जिल्हाध्यक्ष आकाश गजभिये यांनी उमेदवारी प्रकाश गजभिये यांना देण्याची यावेळी मागणी केली. त्यानंतर एकमताने हा ठराव करण्यात आला. जिल्ह्यात राष्ट्रवादीचे हिंगणा ,काटोल व उमरेड विधानसभा मतदारसंघात संघटन मजबूत असल्याचा दावा कार्यकर्त्यांनी केला. यावेळी युवा अध्यक्ष आशिष पुंड, गुड्डू बोकडे, मक्सुद शेख ,वेदांत गोतमारे, पंकज चुकांबे, आदित्य लोखंडे, साबीर शेख, सचिन आमले, सौरभ मिश्रा, विशाल गाडबैल, सोनू गोयल, यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा :

Back to top button