Jitendra Awad |...तर देशातील ८० टक्के लोक शेणच खातात का? : जितेंद्र आव्हाड | पुढारी

Jitendra Awad |...तर देशातील ८० टक्के लोक शेणच खातात का? : जितेंद्र आव्हाड

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : जर मटण खाणाऱ्या माणसाला तुम्ही शेण खातो, असे म्हणणार असाल, तर देशातील ८० टक्के लोक शेणचं खातात का ? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भाजपला केला. राष्ट्रवादी काँगेसच्या एका कार्यक्रमासाठी ते नागपुरात आले असता ते माध्यमांशी बोलत होते.Jitendra Awad

मुख्यमंत्री शिंदे यांच्या दावोस दौरासंदर्भात छेडले असता जाऊद्या त्यांना कुठेही. ते दावोसला जावो की, स्वित्झर्लंडला जावो, मला काय? मी तर नागपूरला आलो आहे, असेही आव्हाड म्हणाले. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेला निकाल दिल्लीतून टाईप होऊन आलेला होता. त्यात अनेक उणिवा आहेत. नार्वेकर असाच निकाल देतील, हे अपेक्षित होते. उद्धव ठाकरे यांना सर्वोच्च न्यायालयात धाव घ्यावी लागेल, हेही अपेक्षित होते, असेही आव्हाड म्हणाले.Jitendra Awad

राम मंदिराच्या नावाने वातावरण निर्मिती सुरू आहे का ? याकडे लक्ष वेधले असता निवडणुकीपूर्वी रामाच्या नावाने वातावरण निर्मितीचे नियोजन होतच आहे. त्यामुळे 22 जानेवारीची तारीख निवडली आहे. मुळात 22 जानेवारी तारखेचा आणि रामाचा काही संबंध आहे का? रामाचा काही वेगळा दिवस आहे का? काही नाही. एकीकडे शंकराचार्य वास्तू अपूर्ण असताना त्यात प्राणप्रतिष्ठा करू नये, असे सांगत असताना, त्यांना वेड्यात काढले जात आहे. मुळात त्यांचे कॅलेंडर, पंचांगही वेगळे आहे. राम बहुजन, क्षत्रिय आहेत. आम्ही बहुजन आहोत, श्री रामाबद्दलच्या वक्तव्याबद्दल मी खेद व्यक्त केला, असे ते म्हणाले.

हेही वाचा 

Back to top button