नागपूर : नव्या हिट अँड रन कायद्याविरोधात वाहन चालक आक्रमक | पुढारी

नागपूर : नव्या हिट अँड रन कायद्याविरोधात वाहन चालक आक्रमक

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : नव्या हिट अँड रन कायद्याविरोधात वाहन चालक आक्रमक असून आज (दि.२) हजारो चालकांनी नागपुरातील संविधान चौक परिसरात एकत्र येत सरकारचा निषेध व्यक्त केला. त्यानंतर ड्रायव्हर युनियन, ड्रायव्हर एकता जिंदाबाद अशा घोषणा देत वाहन चालकांनी मोर्चा काढत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यास पोहोचले. परंतु पोलिसांनी मोर्चा आडवला. त्यानंतर  शिष्टमंडळामार्फत निवेदन देण्यात आले. आणि ‘जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर ४ जानेवारीपासून यापेक्षाही तीव्र आंदोलन करू’ असा इशाराही यावेळी आंदोलकांनी दिला.

महिन्याला ७-८ हजार रुपयांसाठी काम करणाऱ्या ट्रक चालकासाठी हा कायदा अन्यायकारक आहे. एकीकडे संपामुळे जनजीवन विस्कळीत होत आहे. दुसरीकडे रोजीरोटी नसल्याने चालकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तातडीने फेरविचार करावा, अशी मागणी यावेळी निवेदनाद्वारे आंदोलकांनी केली.  तसेच आम्हाला तातडीने न्याय मिळावा आणि सर्व सुरळीत व्हावं, हीच आमची मागणी आहे, असे माध्यमांशी बोलताना छत्रपती शिवाजी बस वाहतूक मंचतर्फे अमित शहाणे यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा :

Back to top button