सिग्नल शाळेला आर्थिक मदत देण्याचे निर्देश देऊ; उदय सामंत यांची विधानसभेत घोषणा

सिग्नल शाळेला आर्थिक मदत देण्याचे निर्देश देऊ; उदय सामंत यांची विधानसभेत घोषणा
Published on
Updated on

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : सिग्नल शाळांच्या पायाभूत सुविधांसाठी आवश्यक ती आर्थिक मदत पुरवण्याचे निर्देश ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्तांना ताबडतोब दिले जातील, आवश्यकता भासल्यास डीपीसीमधून फंड उपलब्ध केला जाईल, अशी घोषणा मंत्री उदय सामंत यांनी आज (दि. ८) विधानसभेत केली.

याबाबत लक्षवेधी सूचनेत बोलताना आमदार अॅड. आशिष शेलार म्हणाले की, दुर्दैवाने रस्त्यावर वाढत असणारी मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत, यासाठी ठाणे येथे महानगरपालिकेच्या परवानगीने सेवाभावी संस्थेतर्फे सिग्नल शाळेचा अभिनव उपक्रम चालवला जातो. सध्या हा उपक्रम कंटेनरमध्ये चालत असून या शाळांना स्नानगृहे, उपहारगृहे, वर्ग इत्यादीसंदर्भात अधिकची आर्थिक मदत अपेक्षित आहे. ठाणे महानगरपालिकेला अशी मदत करण्यास राज्य सरकार सांगणार का?

यावर उत्तर देताना मंत्री उदय सामंत यांनी सिग्नल शाळांच्या पायाभूत सुविधांसाठी आवश्यक ती आर्थिक मदत पुरवण्याचे निर्देश ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्तांना ताबडतोब दिले जातील, असे स्पष्ट केले. तरीही निधीची कमतरता भासल्यास जिल्ह्याचे पालकमंत्री यांना तसेच जिल्हाधिकारी यांना निर्देश दिले जातील, अशी माहिती सामंत यांनी यावेळी दिली.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news