Uday Samant : यवतमाळला व्हिटारा कंपनीचा प्रकल्प; उद्योगमंत्री उदय सामंत यांची माहिती | पुढारी

Uday Samant : यवतमाळला व्हिटारा कंपनीचा प्रकल्प; उद्योगमंत्री उदय सामंत यांची माहिती

पुणे; पुढारी वृत्तसेवा : जगातील मोठ्या उद्योगपतींच्या घराखाली स्फोटके ठेवून घातपाताचा प्रयत्न केला जातो. अशा महाराष्ट्रात उद्योग आणणे जिकरीचे होऊ शकते, असे उद्योजक सांगत आहेत. तसेच 2021 मध्ये साडेआठ हजार कोटींचा व्हिटारा कंपनीचा प्रकल्प यवतमाळमध्ये आला. कंपनीला 47 हेक्टर शासकीय जागा देण्याबाबत करार झाला. मात्र, त्यासाठी बूट झिजवावे लागले. तत्कालीन उद्योगमंत्र्यांना जमिनीबाबत विचारल्यावर त्यांनी नेत्यांना भेटावे लागेल, असे सांगत आढेवेढे घेतले. आता दोन दिवसांत जमीन देण्याचा निर्णय आम्ही घेतला. ठाकरे सरकारच्या काळात महाराष्ट्र उद्योगांत पिछाडीवर गेला होता, अशी टीका उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शनिवारी केली.

पुणे दौर्‍यावर आल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सामंत म्हणाले, ‘ठाकरे सरकारच्या काळात गुंतवणुकीत मागे गेलेला महाराष्ट्र मुख्यमंत्री शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यामुळे पुन्हा देशात पहिल्या क्रमांकावर आणण्यात यशस्वी झालो आहोत.’ दोन वर्षांत नवी मुंबईत मोठा हिरे, ज्वेलरी हब होईल. त्यामुळे मुंबईतून हा हब दुसरीकडे कुठे जायचा प्रश्न नाही, असे डायमंड ज्वेलरी पार्कच्या अध्यक्षांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले आहे, असे सामंत यांनी स्पष्ट केले.

आदित्य ठाकरे खोटे बोलत आहेत

2021 मध्ये व्हिटारा प्रकल्प यवतमाळमध्ये आला. शुक्रवारी यवतमाळच्या दौर्‍यावर गेल्यानंतर व्हिटारा कंपनीच्या अधिकार्‍यांनी जमीनच मिळाली नसल्याचे सांगितले. तत्कालीन उद्योगमंत्र्यांनी आढेवेढे घेतले. ही 47 हेक्टर जमीन देण्याचा निर्णय घेतला आहे. 30 ऑक्टोबरला यवतमाळमध्ये ’शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात जमिनीचा करार कंपनीशी केला जाणार आहे. त्यामुळे सामंत यांना उद्योग खाते कळत नाही, म्हणणारे खोटे बोलत आहेत, अशा शब्दांत सामंत यांनी आदित्य ठाकरे यांचे नाव न घेता टीका केली.

हेही वाचा

Pune Newsदिवाळीनिमित्त एसटीच्या पुण्यातून 512 जादा गाड्या

UP News : बसपा नेत्याच्या नातवाला पीटी शिक्षकाकडून बेदम मारहाण

कुरूंदवाड : दुचाकी चोरणार्‍या रॅकेटचा पर्दाफाश

Back to top button