पंतप्रधान मोदींचे विमान उतरले गोंदियात; प्रफुल्ल पटेल स्वागताला | पुढारी

पंतप्रधान मोदींचे विमान उतरले गोंदियात; प्रफुल्ल पटेल स्वागताला

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : मध्य प्रदेशातील निवडणूक प्रचार सभेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आज (दि.०५) अचानक विदर्भात आगमन झाले. गोंदिया येथील बिरसी आंतरराष्ट्रीय विमानतळावर माजी केंद्रीय मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल, भंडारा गोंदियाचे खासदार सुनील मेंढे, गडचिरोलीचे खासदार अशोक नेते आणि स्थानिक आमदार, लोकप्रतिनिधींनी त्यांचे स्वागत केले.

दिल्ली येथून विशेष विमानाने आगमन झाल्यानंतर स्वागताचा स्वीकार करून लगेच दुसऱ्या हेलिकॉप्टरने ते मध्य प्रदेश, छत्तीसगडच्या निवडणूक प्रचार दौऱ्यावर रवाना झाले. यावेळी खा. प्रफुल्ल पटेल यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेशी विमानतळावर सुरू असलेले हितगुज छायाचित्र व्हायरल होताच राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

हेही वाचा : 

Back to top button