

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : नागपूर शहरात झालेल्या अतिवृष्टी, ढगफुटी सदृश्य पावसाने झालेल्या नुकसानापोटी विरोधकांनी भाजपला घेरण्याचा प्रयत्न केला असतानाच आता सत्तेत सहभागी असलेल्या अजित पवार यांच्या समर्थकांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याची हाक दिली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
या पावसाने अनेक घरे, वाहने, उपकरणे, दुकानाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. प्रशासनाने फक्त काही भागातच पाहणी दौरा केला. झोपडपट्टी भागात प्रशासनाच्या एकाही अधिकाऱ्यांने दौरा केला नाही. याबाबत जाब विचारण्यासाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शहर अध्यक्ष प्रशांत पवार, कार्यकारी अध्यक्ष श्रीकांत शिवणकर, युवक अध्यक्ष विशाल खांडेकर, महिला अध्यक्ष लक्ष्मी सावरकर यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघणार आहे. दक्षिण नागपूर अध्यक्ष अरविंद भाजीपाले, युवक कार्यकारी अध्यक्ष रवी पराते, विद्यार्थी अध्यक्ष विश्वजित तिवारी, माजी नगरसेवक राजेश माटे व गड्डीगोदाम परिसरातील नागरीक व काचीपूरा येथील नागरिकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर हा धडक मोर्चा काढण्यात येत आहे.
हेही वाचा :