नागपुरमधील आरोग्य सुविधांसाठी ५०७ कोटी, फडणवीस यांचे निर्देश

नागपुरमधील आरोग्य सुविधांसाठी ५०७ कोटी, फडणवीस यांचे निर्देश
Published on
Updated on

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : नागपूरमधील मेडिकल, मेयो आणि अन्य आरोग्य सुविधांसाठी ६३९ कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. यातील काही निधी दिला असून उर्वरित ५०७ कोटी रुपयांचा निधी तातडीने देण्यात यावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरातील विविध प्रकल्पांचा आढावा घेताना दिले.

नागपुरातील ६१५ खाटांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय व अनुसंधान केंद्राचे भूमिपूजन लवकरच होणार असून, वाठोडा येथील हॉस्पीटलचे काम सुद्धा तत्काळ सुरु करा, असेही निर्देश देवेंद्र फडणवीस यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कामासाठी ६० कोटी रुपये देण्यात यावे, आरोग्याच्या बाबतीत निधीची तरतूद करा, दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

सह्याद्री अतिथिगृह येथे नागपूरमधील विविध विकास प्रकल्पांची आढावा बैठक उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झाली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नागपूर येथे कर्करोग उपचाराच्या सोयी सुविधा निर्माण करण्यासाठी रेडिओथेरपी विभागाचे श्रेणीसंवर्धन अंतर्गत बांधकाम प्रगतीपथावर असून ते तातडीने पूर्णत्वास नेण्यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून दिला जात आहे. नागपूर सुधार प्रन्यासच्या जागेवर वाठोडा, खसरा येथे ३०० खाटाचे मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल बांधकामही गतीने पूर्ण करण्यात यावे, असे सांगितले.

बैठकीस उपमुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव श्रीकर परदेशी, वित्त विभागाचे प्रधान सचिव ओ. पी. गुप्ता, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता, प्रधान सचिव गोविंदराज, मदत व पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिव सोनिया सेठी, वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, नागपूरच्या विभागीय आयुक्त श्रीमती विजयालक्ष्मी बिदरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर, महापालिका आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांच्यासह नागपूर सुधार प्रन्यास व नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, तसेच इतर संबंधित यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news