Hajj pilgrimage : ‘हज यात्रा’ २३ ते ३० मे दरम्यान जाणार २१०० यात्रेकरू

नागपूर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाहून हज यात्रेसाठी प्रस्थान करणार
Hajj pilgrimage
Hajj pilgrimage : ‘हज यात्रा’ २३ ते ३० मे दरम्यान जाणार २१०० यात्रेकरू File Photo
Published on
Updated on

2,100 pilgrims will go on the 'Hajj Yatra' between May 23 and 30

नागपूर : पुढारी वृत्तसेवा

विदर्भासहित महाराष्ट्र, छत्तीसगड आणि बिहार येथून 23 ते 30 मे दरम्यान नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून हज यात्रेसाठी 2108 यात्रेकरू प्रस्थान करणार आहेत. यात राज्यातील 1521 यात्रेकरु आहेत. विविध विभाग प्रमुखांना सोपविलेली जबाबदारी वेळेत व चोखपणे पूर्ण करण्याचे निर्देश, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी दिले आहेत.

Hajj pilgrimage
Nagpur Crime : अनैतिक संबंधातून काढला पतीचा काटा; पत्नीसह प्रियकराला अटक

आढावा बैठकित सामान्य प्रशासन विभागाचे अपर आयुक्त तेजूसिंग पवार, निवासी उपजिल्हाधिकारी अनूप खांडे, महाराष्ट्र राज्य हज समितीचे अध्यक्ष असिफ खान, संचालक सलिम बागवान व समितीच्या कार्यकारी अधिकारी मेघना शिंदे यांच्यासह पोलीस प्रशासन, महानगरपालिका, विमानतळ प्रशासन, वाहतूक शाखा, सार्वजनिक बांधकाम विभाग, स्टेट बँक ऑफ इंडिया, एअर इंडिया आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

नागपूर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाहून हज यात्रेसाठी महाराष्ट्रातील 1521 यात्रेकरूंसह छत्तीसगड आणि बिहार येथील 587 असे एकूण 2108 हज यात्रेकरु प्रस्थान करणार आहेत. हे यात्रेकरू 30 जुन ते 3 जुलै दरम्यान हज यात्रेवरुन परतणार आहेत.

Hajj pilgrimage
Chandrashekhar Bawankule | चंद्रशेखर बावनकुळे गडबडले; दहशतवाद्यांना म्हणाले 'नक्षलवादी'

या यात्रेकरुंची शहरातील 'हज हाऊस' येथे निवासाची व्यवस्था करण्यात येणार आहे. 'हज हाऊस' येथे यात्रेकरुंसाठी उभारण्यात येणारे विविध मदत कक्ष, विमानतळावर पुरविण्यात येणाऱ्या आवश्यक सुविधा तसेच विमानतळावरील मदत कक्षांच्या तयारीबाबत यावेळी आढावा घेण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news