विदर्भात महायुतीच्या १० जागा निवडून येतील : धर्मरावबाबा आत्राम

विदर्भात महायुतीच्या १० जागा निवडून येतील : धर्मरावबाबा आत्राम
Published on
Updated on

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादीने राज्यातील लोकसभेच्या 10 जागांवर दावा केला आहे. याबाबत वरिष्ठ नेत्यांची बैठक झाल्यावर चित्र स्पष्ट होईल. विदर्भात महायुतीच्या 10 पैकी 10 जागा निवडून येतील, असाही दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व अन्न, औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी केला. ते आज (दि.४) पत्रकारांशी बोलत होते. Dharmaraobaba Atram

आत्राम यांनी गडचिरोली आणि भंडारा-गोंदिया या जागांसाठी आमची मागणी असल्याचे सांगितले. अमरावतीला राष्ट्रवादी काँग्रेसने नवनीत राणा यांना समर्थन दिले होते, त्यामुळे त्या तिथून निवडून आल्या होत्या. विदर्भात आम्हाला दोन जागा हव्या आहेत. एका जागेवर मीच इच्छुक असून घड्याळ चिन्हावरच उभा राहील असेही त्यांनी सांगितले. शेवटी नव्या पिढीला संधी देण्याची गरज आहे. माझ्यानंतर नवीन लोक येतील, त्यांना संधी मिळेल. दिल्लीत राहून इथल्या लोकांना मी मार्गदर्शन करू शकतो, असेही धर्मराव बाबा आत्राम म्हणाले. Dharmaraobaba Atram

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news