

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : नागपूर येथे रिक्षाचालकाला शिवी दिल्याने रागात त्याने तरुणाचा दगडाने ठेचून तरुणाची हत्या केली. दारुच्या नशेत त्याने हे कृत्य केले. रिक्षाचालक आणि मृत तरुण दोघेही दारुच्या नशेत होते. प्रकाश उर्फ राजू लल्लू धकाते (वय २८ वर्षे, विनोवा भावेनगर) असे मृताचे नाव आहे. सतीश पांडुरंग मुळे (वय २७ वर्षे) असे रिक्षावाल्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेनंतर आरोपीने स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाला. यशोधरा पोलिस ठाण्यांतर्गत वीटभट्टी परिसरात ही घटना घडली आहे. सतीश हा ई-रिक्षा चालक असून, तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे. त्याच्यावर मारहाणीचे गुन्हे दाखल आहेत. मृत राजू हा बेरोजगार आहे. दोघेही वीटभट्टी चौका जवळील मैदानात दारु पीत होते. त्यावेळी त्यांच्यात वाद झाला. राजूने सतीशला आईवरुन शिवी दिली. त्यामुळे तो चिडला. दोघांमध्येही हाणमारी झाली. यावेळी त्याने राजूच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर दगडाने वार करुन गंभीर जखमी केले.
घटनेनंतर सतीश घाबरला त्याने यशोधरानगर पोलीस ठाणे गाठले. पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी दाखल केले. पोलिसांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. यानंतर पोलिसांनी सतीशला ताब्यात घेतले.
पोलीस ठाणे गाठल्यावर सतीशने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत राजूला ओळखण्यास नकार दिला. राजू त्याला वाटेत भेटला होता. वनदेवीनगर चौकाच्या अगोदरच तो ई-रिक्षातून उतरला. त्याने २० रुपयांऐवजी १० रुपये भाडे दिले. भांडण झाल्याने तो राजूसोबत घटनास्थळी गेला. तिथे त्याच्यावर हल्ला झाला. नशा उतरल्यानंतर पोलिसांनी चौकशी केली असता सतीशने आईला शिवीगाळ केल्याने खून केल्याची कबुली दिली.
हेही वाचा