नागपूर: बलात्कार प्रकरणातील पीडितेला मदत करणाऱ्या पैलवानाची गोळी झाडून हत्या

file photo
file photo
Published on
Updated on

नागपूर,पुढारी वृत्‍तसेवा : राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये बलात्कार प्रकरणी पीडितेला मदत करणाऱ्या एका पैलवानाची गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. केशव मस्के (वय, ५२) असे हत्या झालेल्या पैलवानाचे नाव आहे. तर भरत कळंबे (वय, ३०) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी संशयिताला अटक केली आहे. बलात्कार प्रकरणात मस्के हे पीडिता आणि तिच्या आईला न्यायालयीन प्रक्रियेसाठी मदत करत होते. परंतु, भावा विरोधातील या प्रकरणात बलात्कार पीडीतेचे कुटुंब आणि इतर साक्षीदारांना न्यायालयीन कामकाजात मदत करतो, या रागातून बलात्कार प्रकरणातील आरोपीचा सख्खा भाऊ भरत कळंबे याने बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या केशव मस्के यांची हत्या केली असा पोलीसांना संशय आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूरमधील नरखेड पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या बेलोना गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी या प्रकरणी गोळी झाडून केशव मस्के यांची हत्या करणाऱ्या भरत कळंबे या संशयीत आरोपीला अटक केली आहे. साेमवारी (दि.12) रात्री केशव हे दूध वाटून परत आपल्या घराकडे जात असताना भरत याने त्यांच्यावर गोळी झाडली. यात केशव यांचा जागीच मृत्यू झाला. आरोपीचा भाऊ बलात्काराच्या प्रकरणात तुरुंगात असून हत्या झालेले केशव मस्के हे बलात्कार पीडित आणि तिच्या आईला मदत करत होते. तोच राग भरत याच्या मनात होता. त्यातूनच भरत कळंबे याने केशव यांच्यावर गोळी झाडून त्यांची हत्या केली.

केशव हे कुस्तीचे जिल्हा स्तरावरील चॅम्पियन होते. दरम्यान, हत्येच्या या घटनेनंतर गावात एकच खळबळ उडाली. या प्रकरणी आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी गावकऱ्यांनी पोलिसांकडे केली आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news