suicide in Nagpur : किरकोळ वादातून पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या; पती गंभीर

suicide in Nagpur : किरकोळ वादातून पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या; पती गंभीर

नागपूर : पुढारी वृत्तसेवा : किरकोळ भांडणातून पती- पत्नीने आत्महत्या suicide in Nagpur केल्याची घटना घडली. या घटनेत पत्नीचा मृत्यू झाला असून पतीवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. पत्नीने गळफास लावून आत्महत्या केली. तर पतीने विष घेतले. ही घटना आज (दि. ९) सकाळी साडेदहाच्या सुमारास कपिलनगर परिसरातील बाबा दिपसिंग गुरुद्वारामागे उघडकीस आली. रितू प्रफुल्ल सहारे (वय २५) असे मृत पत्नीचे नाव आहे. तर प्रफुल्ल सहारे ( वय ३०) असे उपचार घेत असलेल्या पतीचे नाव आहे.

(suicide in Nagpur) याबाबत अधिक माहिती अशी, आज सकाळी दोघेही खोलीबाहेर आले नाहीत. त्यामुळे प्रफुल्लचा भाऊ प्रशांत याला शंका आली. त्याने त्यांच्या खोलीचे दार ठोठावले. मात्र, प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे त्याने खोलीचे दार तोडले. यावेळी प्रफुल्ल सहारे यांच्या तोडातून फेस येत होता. याशिवाय रितू सहारे या ओढणीच्या सहायाने गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसल्या. घटनेची माहिती कपिलनगर पोलिसांना देण्यात आली. त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. रितू सहारे यांचा मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. तर प्रफुल्ल सहारे यास रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पती-पत्नीमध्ये सकाळी भांडण झाल्याची माहिती पोलिसांना प्राथमिक तपासात मिळाली आहे.

हेही वाचलंत का ? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news