नागपूर : प्रॉपर्टी डीलिंगच्या वादात मित्र झाले वैरी; अग्रसेन चौकात एकाचा खून

नागपूर : प्रॉपर्टी डीलिंगच्या वादात मित्र झाले वैरी; अग्रसेन चौकात एकाचा खून

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : प्रॉपर्टी डीलिंगच्या व्यवसायात असलेल्या दोन मित्रांमध्ये कमिशनच्या पैशावरून वितूष्ट आले आणि या वादात ते पक्के वैरी झाले. यात एकाचा खून झाला. ही घटना नागपूर येथील अग्रसेन चौकात घडली. परवेज शेख उर्फ पापा मिया शेख (वय ३०, रा. खरबी) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी संशयीत आरोपी प्रॉपर्टी डीलर परवेज याकुब खान (वय २८, रा. पारडी) याच्यासह त्याच्या चार सहकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

परवेज खान व परवेज शेख या दोघांची बरेच दिवसापासून प्रॉपर्टी डिलिंग व्यवसाय करीत असल्याने चांगली मैत्री होती. पैशासाठी त्यांच्यात वाद झाला. हा वाद विकोपाला गेला. परवेज शेख याला पैसे देण्याचे आमिष देत परवेज खान याने त्याला अग्रसेन चौकात बोलावले. तेथे अल्यानंतर परवेज व त्याच्या चार सहकाऱ्यांनी त्याचा गळा चिरून, सपासप शस्त्रांचे घाव घालून खून केला. याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल झाली आहे.

हेही वचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news