Praful Patel: राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांना ईडीचा दणका : मुंबईतील मालमत्ता जप्त | पुढारी

Praful Patel: राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांना ईडीचा दणका : मुंबईतील मालमत्ता जप्त

पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांच्या कुटुंबियांची मुंबईतील मालमत्ता सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) जप्त केली आहे. ईडीने सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर ही माहिती दिली आहे. दरम्यान, जप्त करण्याची कारवाई २०२२ मध्ये केली होती. मात्र, ही प्रक्रिया आता पूर्ण झाली असून न्यायनिर्णय प्राधिकरणाने त्यास दुजोरा दिला आहे. वरळी येथील सीजे हाऊस इमारतीमधील चार मजले पटेल कुटुंबाच्या मालकीचे आहेत. या कारवाईनंतर आता पटेल कुटुंबाला हे चारही मजले रिकामे करावे लागणार आहेत.

इक्बाल मिर्ची प्रकरण

ऑक्टोबर 2019 मध्ये पटेल यांची 12 तासांहून अधिक चौकशी करण्यात आली होती. पटेल आणि त्यांच्या कुटुंबियांच्या कंपनीने सीजे हाऊस विकसित केले होते. त्यानंतर इक्बाल मिर्चीच्या कुटुंबीयांना दोन मजले देण्यात आले होते. इक्बाल मिर्चीची पत्नी हाजरा आणि मुले आसिफ आणि जुनैद यांना या प्रकरणात अनेक वेळा समन्स बजावण्यात आले होते, परंतु ते हजर होऊ शकले नाहीत. ईडीने या प्रकरणात इक्बाल मिर्ची आणि कुटुंबाची विदेशातील मालमत्ताही जप्त केली आहे. याच प्रकरणात डीएचएफएलचे वाधवान बंधू कपिल आणि धीरज यांची चौकशी झाली असून कपिल वाधवान अटकेत आहे, तर धीरज वाधवान जामिनावर बाहेर  आले आहेत.

हेही वाचा 

Back to top button