नागपूर : केडीके रोडवरील कापड दुकानाला आग

नागपूर : केडीके रोडवरील कापड दुकानाला आग

Published on

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : नंदनवन परिसरातील केडीके कॉलेज रोडवरील कानीबीस फॅशन स्टुडिओ या कापडाच्या दुकानाला आज (दि.८) भीषण आग लागली. या आगीत तीन मजली इमारत जळून खाक झाली. यामध्ये सुमारे पंधरा लाख रुपयांचे नुकसान झाले.

आग लागली तेव्हा योगेश नरेंद्र पसीने, श्रुती योगेश पसीने, आस्था योगेश पसीने, कबीर योगेश पसीने हे घरात होते. अग्निशमन पथकाने त्यांना सुखरूप बाहेर काढल्यामुळे मोठा अनर्थ टळला. या घटनेची माहिती मिळताच लकडगंज अग्निशमन स्थानकातील गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. अग्निशमन अधिकारी डी.पी.चव्हाण, शेख चवरे, कोरचे, येडवे, मेश्राम आदी सहकाऱ्यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. यासाठी अग्निशमन अधिकारी शिर्के आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी देखील प्रयत्न केले. या आगीत सुमारे पंधरा लाख रुपयांचे नुकसान झाले.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news