नागपूर: बाजार समिती निवडणुकीसाठी शिंदे गटाचा काँग्रेससोबत घरोबा

नागपूर: बाजार समिती निवडणुकीसाठी शिंदे गटाचा काँग्रेससोबत घरोबा

नागपूर : पुढारी वृत्तसेवा : नागपूर जिल्ह्यातील ७ बाजार समित्‍यांच्या निवडणुका होत आहेत. यातील तीन बाजार समितीसाठी आज (दि. २८) मतदान झाले. नागपूर जिल्ह्यातील ७ बाजार समितीच्या निवडणुका जाहीर झाल्या असून सावनेर बाजार समितीमध्ये काँग्रेसचे आमदार सुनील केदार गटाने विरोधकांना धूळ चारुन सर्व १८ जागा जिंकल्या आहेत. विरोधकांनी सुनील केदार यांच्या गटाविरोधात उमेदवारी अर्जच न भरल्यामुळे सर्व उमेदवार बिनविरोध निवडून आले.

दरम्यान, रामटेक, कुही-मांढळ आणि पारशिवनी बाजार समितीसाठी आज मतदान झाले. रामटेक बाजार समितीमध्ये केदार गटाविरोधात चार पक्षांनी मोट बांधल्यामुळे शेवटी आमदार सुनील केदार यांनी शिंदे गट, शिवसेनेचे आमदार आशिष जयस्वाल यांच्यासोबत युती करून विरोधकांविरोधात दंड थोपटले आहेत. तर दुसरीकडे भाजपचे माजी आमदार डी मल्लिकार्जुन रेड्डी यांनी काँग्रेसचे गज्जू यादव यांच्यासह इतर दोन पक्षांनी मोट बांधली आहे. याठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून आमदार सुनील केदार यांचे वर्चस्व आहे. यावेळी मात्र, त्यांचे खंदे समर्थक त्यांच्याच विरोधात गेल्याने शेवटी आशिष जयस्वाल यांच्या गटासोबत त्यांना युती करावी लागली आहे.

एकंदरीत शिंदे गटासोबत काँग्रेसची आघाडी झाली आहे. पारशिवनी येथे केदार गटाचे चार उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. येथेही काँग्रेस विरुद्ध भाजप, राष्ट्रवादी अशीच रंगत राहणार आहे. पण कुही बाजार समितीवर गेल्या अनेक वर्षांपासून माजी आमदार, जिल्हा अध्यक्ष राजेंद्र मुळक यांच्या गटाचे वर्चस्व राहिले आहे. पण यावेळी मात्र, राष्ट्रवादीसोबत आघाडीची शक्यता असताना राजेंद्र मुळक गटाने कुरघोडी करीत आपले १५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरविले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने जीवनलाल डोंगरे यांच्या नेतृत्वात दोन उमेदवार दिले आहेत. वंचित बहुजन आघाडीला घेतले आहे. त्यामुळे येथे राष्ट्रवादी, भाजप आणि काँग्रेस असा सामना रंगणार आहे. अर्थातच जिल्ह्यातील नव्या राजकीय समीकरणात यात परंपरागत काँग्रेसचे किती उमेदवार निवडून येतील, याकडे लक्ष लागले आहे.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news