file photo
file photo

नागपूर जिल्‍ह्यात ४ दिवस मेघगर्जनेसह पाऊस; हवामान विभागाचा अंदाज

Published on

नागपूर ; पुढारी वृत्‍तसेवा नागपूर जिल्ह्यामध्ये दिनांक २४ ते २८ एप्रिल या कालावधीत वादळीवाऱ्यासह वीजांच्या कडकडाटात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवलेली आहे. या कालावधीत येलो अलर्ट जारी केला आहे. आज २५ एप्रिल रोजी Orange Alert दिला असून, बहुतांश ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसासह काही ठिकाणी वादळीवारा, वीज गर्जना व गारपीट होण्याची शक्यता वर्तवलेली आहे. नागरिकांनी विषेशत: शेतकऱ्यांनी आवश्यक काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आल आहे.

वीज गर्जना होत असताना शक्यतो घरातच राहणे आवश्यक आहे. शेतात कामाला जात असताना अशा कालावधीमध्ये मोबाईल फोन सोबत बाळगू नये. वीज गर्जना सुरू असताना घरातील इलेक्ट्रिकल उपकरणे बंद ठेवावीत. पाऊस व वीज गर्जना होत असताना चुकूनही झाडाच्या खाली उभे राहू नये व शेतात काम करत असताना सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा. जनावरांना मोकळ्या जागेत चरावयास सोडण्याचे टाळावे. तसेच गोठयामध्येच चारा व पाण्याची उपलब्धता करून द्यावी. शेतपिकांची काळजी घेत स्वसंरक्षणासाठी सतर्क राहावे असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्‍हाधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news