नागपूर : रागाच्या भरात घरातून गेलेल्या मुलीला पोलिसांनी तासाभरात शोधून काढले

file photo
file photo
Published on
Updated on

नागपूर; पुढारी वृत्तसेवा: आईशी झालेल्या वादातून रागाच्या भरात घरातून निघून गेलेल्या एका १४ वर्षाच्या मुलीला वाठोडा पोलिसांनी अवघ्या तासाभरात शोधून काढले. खरबी येथील नगराळे लेआऊट येथील १४ वर्षाची मुलगी आईसोबत किरकोळ वाद झाल्याने घरातून मोबाईल घेऊन निघून गेली होती. याबाबत पोलिसांत तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तत्परतेने तिला शोधून पोलिसांच्या स्वाधीन केले.

या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी झोन ४ मध्ये सायबर क्राईममध्ये काम करणारे दीपक तरईकर यांच्याकडून मुलीचे मोबाईल लोकेशन ट्रेस केले. नंतर पोलिसांच्या शोध पथकासोबत तिचे बाबा व काका होते. पहिल्यांदा नंदनवन हद्दीतील भीमचौकातून पोलिसांनी तपासाला सुरूवात केली. मुलगी पायी फिरत असल्याने तिच्याकडे असलेल्या मोबाईलचे लोकेशन बदलत होते. परत लोकेशन ट्रेस केले असता सेंट झेव्हीयर शाळेकडे लोकेशन दाखवले. पोलिसांनी तिकडे धाव घेत शाळेकडून वाठोडाकडे येणाऱ्या रस्त्यावर मुलगी जात होती. पोलिसांनी तिची विचारपूस करून पोलीस ठाण्यात आणले.

घाबरलेल्या मुलीचे महिला पोलीस रोहिणी परतिपे यांनी समुपदेशन केले. पीआय हरिशकुमार बोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय दीपक पवार, पोलीस शिपाई योगेश डबले, कैलास श्रावणकर आदींनी तपास केला. तासाभरात मुलगी घरी परतल्याने घरच्यांच्या चेहऱ्यावर हास्य पसरले.

मुलगा अद्यापही नाही परतला

दोनच दिवसांपूर्वी 'सुट्टी असल्याने मित्रासोबत जात आहे' असा टेक्स्ट मेसेज आईच्या मोबाईलवर सोडून मुलगा बॅगेत कपडे टाकून घरून निघून गेल्याची घटना एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली होती. या घटनेतील मुलगा अजून घरी परत यायचा असताना मुलगी घरून निघून गेल्याची घटना घडल्याने पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. आणि तासाभरात मुलीला शोधून काढले.

हेही वाचलंत का ? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news