वाशिम: चारित्र्याच्या संशयावरून पत्नी, सासूला मारहाण; सासूचा मृत्यू

वाशिम: चारित्र्याच्या संशयावरून पत्नी, सासूला मारहाण; सासूचा मृत्यू
Published on: 
Updated on: 

वाशिम: पुढारी वृत्तसेवा : चारित्र्याच्या संशयावरून पत्नी आणि सासूला दारूच्या नशेत जावयाने मारहाण केली. या मारहाणीत सासूचा जागीच मृत्यू झाला. तर पत्नी गंभीर जखमी झाली. ही घटना गुरूवारी (दि. २३) शहरातील बिलालनगर येथे घडली. पत्नीला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी शेख समीर शेख चाँद यांनी फिर्याद दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अब्दुल हफिज अब्दुल सलाम हा त्याची पत्नी सबा परवीन आणि आपल्या दोन मुलांसह बिलाल नगर येथे राहत होता. अब्दुल हा नेहमी पत्नीवर संशय घेऊन मारहाण करायचा. गुरूवारी अब्दुल हाफिज अब्दुल सलाम याने पत्नीवर संशय घेऊन पत्नी सबा परवीन व सासू रुबिनाबी शेख चाँद यांना लोखंडी फावड्याने मारहाण केली. यामध्ये सासूच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर, पत्नी सबा परवीन ही गंभीर जखमी झाल्यामुळे तिला संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या प्रकरणी वाशिम पोलिसांनी संशयित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अलका गायकवाड करीत आहेत.

हेही वाचा;

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news