Mother Killed Her Baby: मातृत्वाला काळीमा! नोकरी करता येणार नाही म्हणून... आईनेच २० दिवसांच्या पोटच्या गोळ्याला नदीत फेकलं

महिलेने बाळ चोरी झाल्याची खोटी तक्रार रावणवाडी पोलिसांत दाखल केली होती. मात्र...
Mother Killed Her Baby
Mother Killed Her Babypudhari photo
Published on
Updated on

Gondia Mother Killed Her Baby:

गोंदिया जिल्ह्यातील डांगुर्ली परिसरात आई-मुलाच्या नात्याला काळिमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नोकरी करण्याच्या इच्छेपोटी एका जन्मदात्या आईनेच आपल्या अवघ्या २० दिवसांच्या नवजात बाळाला संपवल्याची कबुली दिली आहे.

घटनेनंतर आरोपी महिलेने बाळ चोरी झाल्याची खोटी तक्रार रावणवाडी पोलिसांत दाखल केली होती. मात्र, पोलिसांना तिच्या तक्रारीत संशयास्पद बाबी आढळल्याने त्यांनी आई आणि वडिलांची सखोल चौकशी सुरू केली.

Mother Killed Her Baby
Latur Crime News : रस्त्यावर वाढदिवस करणे भोवले, आठ युवकांवर गुन्हा दाखल

नोकरी करता येणार नाही म्हणून....

पोलिसांच्या कसून चौकशीत, बाळाच्या आईने गुन्हा कबूल केला. बाळामुळे आपल्याला घरीच थांबावे लागेल आणि नोकरी करता येणार नाही, या विचारातून तिने बाळाला संपवले. रात्री घरातून बाळाला घेऊन जात तिने वाघ नदीच्या पात्रात फेकल्याची कबुली तिने दिली.

पोलिसांनी वाघ नदीच्या पात्रातून बाळाचा मृतदेह बाहेर काढला असून, आरोपी महिलेवर खुनाचा गुन्हा दाखल करून तिला अटक करण्यात आली आहे.

Mother Killed Her Baby
Crime News: फ्लाय ओव्हरवर Money Heist स्टाईल दरोडा! RBI चे अधिकारी म्हणून आले अन् ३० मिनिटात ७ कोटी रूपये लुटून गेले

पोलिसांना होती शंका

पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्यावेळी आईनं मुल चोरीला गेल्याची तक्रार दाखल केली त्यावेळी तिच्या तक्रारीबाबत पोलिसांना संशय वाटत होता. तक्रारदार आई आणि वडील होते. शंका वाटल्यानंतर आम्ही या दोघांची पोलीस चौकशी केली. या चौकशीत बाळाच्या आईनं आपणच बाळाची हत्या केल्याची कबुली दिली. त्यांनी राहत्या घराजवळील नदीत ते बाळ फेकून दिल्याची कबुली दिली. आता या प्रकरणात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी आई अटकेत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news