Gondia Crime News: म्हसगावच्या ढिवरू इळपाचे खून प्रकरणाला नवे वळण; आणखी दोन संशयितांना अटक

file photo
file photo
Published on
Updated on

गोंदिया, पुढारी वृत्तसेवा : गोरेगाव तालुक्यातील म्हसगाव येथील ढिवरू इसन इळपाचे (वय ५५) याच्या खून प्रकरणात पोलिसांनी शनिवारी (दि.४) सकाळी मृताचा पुतण्या विरेंद्र बेनीराम इळपाचे (वय २८ रा. म्हसगाव ) यास अटक केली होती. तर जमिनीच्या वादातून खून केल्याचे निष्पन्न झाले होते. मात्र, तपासात संशयिताने साथीदारांसह कट करून खून करण्यात आल्याचे सांगितले. तर आपण कटात सामील असल्याचे बयाणही त्याने दिले आहे. त्यामुळे या प्रकरणाला नवे वळण लागले असून पोलिसांनी या प्रकरणात आणखी दोघांना अटक केली आहे. त्यामुळे आता मुख्य आरोपी बदलण्याची शक्यता आहे. तिघांपैकी नेमका मुख्य आरोपी कोण ? त्या दिशेने पोलीस तपास करीत आहेत. Gondia Crime News

कुवरलाल उर्फ भुरू रामचंद इळपाचे (वय २९) व बाळकृष्ण प्रेमलाल मळकाम (वय ३०, दोघेही रा. म्हसगाव) असे अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. Gondia Crime News

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, म्हसगाव येथील ढिवरु इळपाचे याच्या खुनाच्या गुन्ह्यात पोलिसांनी फिर्यादी धनवंता ढिवरू इळपाचे (वय ५१) यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंद करून तपासादरम्यान ( दि.४) सकाळी मृताचा पुतण्या विरेंद्र इळपाचे यास अटक केली होती. तर त्याने आपणच घराच्या जागेच्या जुन्या वादातून खून केल्याची कबुली दिली होती.

Gondia Crime News जादुटोनाच्या संशयावरून वाद

दरम्यान, त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला ९ मेपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली होती. तपासादरम्यान, आरोपीने खुनाचा कट करण्यात आला असून आपण खुनाच्या कटात सहभागी असल्याचे बयाण दिले. तर यात आणखी काही आरोपी असल्याचे पोलिसांना सांगितले. या आधारावर पोलिसांनी तपासचक्र फिरवत पुन्हा शनिवारी सायंकाळच्या सुमारास मृताच्या घराशेजारीलच संशय़ित कुवरलाल इळपाचे व बाळकृष्ण मळकाम या दोघांना ताब्यात घेत विचारपूस केली. यावेळी दोन्ही आरोपींनी देखील खुनाच्या कटात सहभागी असून संशयित विरेंद्र याचे जागेच्या वादातून तर संशयित कुवरलाल याचा जादुटोनाच्या संशयावरून वाद होता.

तर संशयित बाळकृष्ण याचा उधारीच्या पैशातून वाद असल्याने तिघांनी मृत ढिवरू यास संपविण्याचा कट केल्याचे कबूल केले. ज्यामध्ये विरेंद्र हा १० हजार रुपये तर कुवरलाल याच्याकडून ३० हजार रुपये बाळकृष्ण याला देण्याचे ठरले. ठरल्यानुसार मृत ढिवरू घरी एकटा व झोपेत असल्याचे पाहून त्याचा कुऱ्हाडीने वार करुन खून करण्यात आल्याचे सांगितले.

दरम्यान, पोलिसांनी दोन्ही आरोपींना आज, (दि.५) न्यायालयात हजर केले आहे. तर तिघांपैकी नेमका खून कुणी केला. यासह खुनात वापरलेले शस्त्र व इतर पुराव्यांचा तपास पोलीस करीत आहेत.

म्हसगाव येथील हत्या प्रकरणात आरोपी विरेंद्र इळपाचे यास ताब्यात घेण्यात आले होते. न्यायालयाने त्याला ९ मेपर्यंत पोलीस कोठडी दिली असून तपासात विरेंद्र याने या हत्याप्रकरणात आणखी साथीदार असल्याचे सांगितले. दरम्यान, शनिवारी सायंकाळपर्यंत त्याच्या दोन साथीदारांना अटक करण्यात आली आहे. दोघांनाही आज न्यायालयात हजर करण्यात येणार असून पुढील तपास सुरू आहे.

– अजय भुसारी, पोलीस निरीक्षक, गोरेगाव

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news