भंडारा/गोंदिया; पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तडकाफडकी राज्यातील ११ जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांची सुधारीत यादी आज जाहीर केली. यामध्ये भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री बदलण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे यापूर्वी भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस तर गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार या हेवीवेट नेत्यांकडे होते. नव्या यादीनुसार भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्रीपद विजयकुमार गावीत यांच्याकडे तर गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्रीपद धर्मरावबाबा आत्राम यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. (Bhandara-Gondiya News)
हेही वाचा