भंडारा-गोंदिया लोकसभा: ४ विधानसभा मतदारसंघात भाजप पिछाडीवर

भंडारा-गोंदिया लोकसभा: ४ विधानसभा मतदारसंघात भाजप पिछाडीवर
Published on
Updated on

भंडारा: पुढारी वृत्तसेवा: भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील सहा विधानसभा क्षेत्र मिळून लोकसभा क्षेत्र आहे. या मतदारसंघातील गोंदिया आणि तिरोडा विधानसभा मतदारसंघात भाजपला चांगली मुसंडी मिळाली. मात्र, भंडारा, तुमसर, साकोली आणि मोरगाव अर्जुनी या मतदारसंघात भाजप माघारल्याने भाजपचे उमेदवार सुनील मेंढे यांचा पराभव झाला. भंडाऱ्यात सुनील मेंढे यांच्याबद्दलची नाराजी पराभवाला कारणीभूत ठरली.

भंडारा-गोंदिया लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी लागला. यात कॉंग्रेसचे डॉ. प्रशांत पडोळे यांनी ३७ हजार ३८० मतांची आघाडी घेऊन भाजपचे सुनील मेंढे यांचा पराभव केला. विद्यमान खासदार असताना सुनील मेंढे यांचा पराभव का झाला, यावर आता विचारमंथन सुरू आहे. त्याचबरोबर कार्यकर्त्यांची मोठी फळी, ५ वर्षात विकासकामे करुनही विधानसभानिहाय मतांमध्ये घसरण आल्याने नेमके कुठे चूक झाली, याची कारणीमांसा केली जात आहे.

भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात भंडारा, तुमसर, साकोली, तिरोडा, गोंदिया आणि मोरगाव/अर्जुनी या विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत मतमोजणीची प्रक्रिया सुरू होती. त्यानंतर विधानसभानिहाय उमेदवारांना मिळालेल्या मतांची आकडेमोड सुरू झाली आहे.

भाजपचे उमेदवार सुनील मेंढे यांच्या होम टाऊन असलेल्या भंडारा विधानसभेत त्यांना ९९ हजार ५७५ मते मिळाली. तर कॉंग्रेसचे डॉ. प्रशांत पडोळे यांना १ लाख २२ हजार ४२८ मते मिळाली. सुनील मेंढे २२ हजार ८५३ मतांनी पिछाडीवर आहेत. तुमसर विधानसभेत सुनील मेंढे यांना ९१ हजार २०४ मते तर डॉ. प्रशांत पडोळे यांना १लाख २२० मते मिळाली आहे. याठिकाणी सुनील मेंढे ९ हजार १६ मतांनी पिछाडीवर आहेत. भंडारा जिल्ह्यात पिछाडीवर असताना गोंदिया विधानसभेत मात्र सुनील मेंढे यांना १ लाख १० हजार ८११ तर तिरोडा विधानसभेत ८२ हजार ७०० मते मिळाली आहेत. या दोन्ही विधानसभेत डॉ. प्रशांत पडोळे अनुक्रमे ३५ हजार ४९९ आणि ८ हजार ९३८ मतांनी पिछाडीवर आहेत.

नाना पटोले ठरले किंगमेकर

साकोली आणि मोरगाव/अर्जुनी हे विधानसभा मतदारसंघ कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे गड मानले जातात. कॉंग्रेस उमेदवार डॉ. प्रशांत पडोळे यांना या दोन मतदारसंघात मोठी साथ मिळाली. डॉ. पडोळे यांना साकोली मतदारसंघातून २७ हजार ३६६ मतांची आघाडी मिळाली तर मोरगाव/अर्जुनी मतदारसंघातून २० हजार ६५८ मतांची आघाडी मिळाली. या दोन्ही मतदारसंघात मिळालेल्या आघाडीमुळे कॉंग्रेसचे डॉ. प्रशांत पडोळे यांचा विजयाचा मार्ग सुकर झाला. यात नाना पटोले किंगमेकर ठरले.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news