Stock Market Closing Bell : पुन्‍हा ‘एनडीए’ सरकारचे संकेत, सेन्सेक्स 2303 अंकांनी वधारला

संग्रहित छायाचित्र.
संग्रहित छायाचित्र.

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : लोकसभा निवडणूक निकालानंतर मंगळवारी (दि.४ जून) देशातंर्गत शेअर बाजाराने मोठी पडझड अनुभवली होती. मात्र केंद्रात पुन्‍हा एकदा स्‍थिर सरकार येण्‍याचे संकेत मिळताच आज (दि.५) शेअर बाजाराने तेजी अनुभवली. दिवसभर तेजीत असलेल्‍या बाजार मजबूत वाढीसह बंद झाला. निफ्टी 735 अंकांनी वाढून 22,620 वर तर  सेन्सेक्स 2303 अंकांनी वाढून 74,382 वर बंद झाला. निफ्टी बँक 2126 अंकांनी वाढून 49,054 वर बंद झाला.

आज शेअर बाजारात काय घडलं?

सकाळपासूनच हिरवाईत बाजारात खरेदी-विक्री सुरू झाली. सेन्सेक्स 600 हून अधिक अंकांच्या वाढीसह उघडला, तर निफ्टीही 200 हून अधिक अंकांच्या वाढीसह उघडला. निफ्टी बँकेतही चांगली वाढ झाली. क्लोजिंग बेल- सेन्सेक्स, निफ्टी 3% ची वाढ झाली. यासह सर्व क्षेत्रीय निर्देशांक हिरव्या रंगात व्यवहार करताना दिसले. भारतीय बेंचमार्क निर्देशांकांनी मंगळवारी झालेले नुकसान कमी केले. निफ्टी 22,600 च्या वर परतला.

आज ऑटो, बँक, एफएमसीजी, मेटल, टेलिकॉम आणि मीडियामध्ये 4-6 टक्क्यांची वाढ दिसून आली. हे सर्व क्षेत्रीय निर्देशांक खाजगी ट्रेंडसह बंद झाले. BSE मिडकॅप निर्देशांक 4 टक्क्यांनी वधारला. तर स्मॉलकॅप निर्देशांक 3 टक्क्यांनी वाढला. BSE सेन्सेक्स आणि निफ्टीचे सर्व शेअर्स हिरव्या रंगात बंद झाले. सेन्सेक्स-निफ्टी निर्देशांक प्रत्येकी 3% वाढीसह बंद झाले निफ्टी 735 अंकांनी वाढून 22,620 वर बंद झाला.सेन्सेक्स 2303 अंकांनी वाढून 74,382 वर बंद झाला. निफ्टी बँक 2126 अंकांनी वाढून 49,054 वर बंद झाला. . मिड आणि स्मॉलकॅप निर्देशांकही मजबूत वाढीसह बंद झाले. निफ्टी मिडकॅप 2115 अंकांच्या वाढीसह 51,266 वर बंद झाला आणि स्मॉलकॅप 597 अंकांच्या वाढीसह 16,289 वर बंद झाला.

चंद्राबाबू नायडूंच्‍या वक्तव्यानंतर बाजाराचा आत्‍मविश्‍वास वाढला

लोकसभा निवडणुकीत भाजपला एकहाती सत्ता मिळवण्‍यात अपयश आले आहे. आता भाजप प्रणित 'एनडीए'तील चंद्राबाबू नायडू आणि जेडीयू नेते नितीश कुमार यांचे महत्त्‍व चांगलेच वाढले आहे. सरकार स्‍थापन करण्‍यात त्‍यांचे योगदान महत्त्‍वपूर्ण ठरणार आहे. मात्र आता चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार हे इंडिया आघाडीत सहभागी होतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु असतानाच आम्‍ही एनडीएबरोबरच आहोत, असे स्‍पष्‍ट करत आज स्‍वत: चंद्राबाबू नायडू यांनी या चर्चेला पूर्णविराम दिला. याचा सकारात्‍मक परिणाम शेअर बाजारवर दिसला.

मंगळवारी बाजाराने अनुभवली होती मोठी पडझड

लोकसभा निवडणुकीच्‍या निकालाचा परिणाम बाजारावर झाला होता नकारात्‍मक परिणाम झाला. भाजपला पूर्ण बहुमत न मिळाल्यामुळे कोरोनानंतरचया काळातील सर्वात मोठी घसरण बाजाराने अनुभवली. गुंतवणूकदारांच्‍या संपत्तीत 31 लाख कोटी रुपयांची घट झाली होती; पण आज केंद्रात पुन्‍हा एकदा भाजप प्रणित एनडीए सरकार स्‍थापन हाेण्‍याचे संकेत मिळताच शेअर बाजार सावरला आणि गुंतवणूकदारांना माेठा दिलासा मिळाला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news