१० रुपयाच्या वादावरून तरुणाचा खून

सालेकसाच्या बाबाटोली येथील घटना
Gondiya Crime News
१० रुपयाच्या वादावरून तरुणाचा खून File Photo
Published on
Updated on

गोंदिया, पुढारी वृत्तसेवा : हरवलेले १० रूपये पकडल्याच्या आरोपावरून झालेल्या भांडणात मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या युवकाचा आरोपीने धारदार कात्रीने छाती व पोटावर वार करून खून केल्याची घटना बाबाटोली येथे घडली. ही घटना मंगळवारी (दि.१५) रात्री ९.३० वाजताच्या सुमारास घडली. अरबाज अहमद साह (वय २५ रा. बाबाटोली / सालेकसा ) असे मृताचे नाव आहे. तर अलिफ मैदासा खान (वय २५ रा. कडगीरोड/कोटा, जि. बिलासपूर छ.ग.) बाबाटोली असे संशयित आरोपीचे नाव आहे.

Gondiya Crime News
झोपेतून उठला अन् ८ नशेच्या गोळ्या खाऊन एकाच घावात केला तरुणाचा खून

सालेकसा शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या बाबाटोली येथे संशयित आरोपी अलिफ खान हा इतर शेजाऱ्यांसोबत मृत अरबाज यांच्या घरासमोर तासपत्ते खेळत असताना त्याचे १० रुपये हरवले. दरम्यान, त्याने मृताची पत्नी फिर्यादी तसिना अरबाज साह (वय २० रा. बाबटोली) हिच्यावर पैसे पकडल्याचा आरोप करीत तिच्याशी भांडण करून तिच्या जवळील पैसे हिसकावण्याचा प्रयत्न केला. यावेळी अरबाजने मध्यस्थी करून भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आरोपीने त्यास शिवीगाळ करून भांडण केले. या भांडणात अरबाज याने आरोपीच्या गळ्यावर काही तरी वस्तूने मारल्याने त्याच्या गळ्यातून रक्त निघू लागले. दरम्यान, आरोपीच्या पत्नीने त्याठिकाणी येवून त्यास घरी नेले.

Gondiya Crime News
गोंदिया : कट रचून वडिलांचा खून; मुलाला ३ वर्षांनी अटक

परंतु आरोपीने पुन्हा सदर ठिकाणी येत अरबाजशी भांडण करून कैचीने त्याच्या छातीवर व पोटावर वार करून त्यास जिवानिशी ठार केले. घटनेची माहिती सालेकसा पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. या प्रकरणी मृत अरबाजची पत्नी तसिना हिच्या तक्रारीवरून सालेकसा पोलिसांनी बुधवारी (दि. १६) पहाटे २.४५ वाजताच्या सुमारास आरोपीच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक भूषण बुराडे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक बंडू थेरे करीत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news