गोंदिया : कट रचून वडिलांचा खून; मुलाला ३ वर्षांनी अटक

इमेंग्रेशन ब्युरो नवी दिल्ली यांच्यासह डुग्गीपार पोलिसांची कारवाई
Gondia murder case
कट रचून वडिलांचा खून करणाऱ्या मुलाला अटक
Published on
Updated on

गोंदिया : कट रचून वडिलांचा खून करणार्‍या आरोपी मुलाला इमेंग्रेशन ब्युरो नवी दिल्ली येथील पथकाच्या मदतीने तीन वर्षानंतर डुग्गीपार पोलिसांनी अटक केली. निखिल खुमराज रहांगडाले (रा. म्हसवानी, ता. सडक अर्जुनी, जि. गोंदिया) असे अटक करण्यात आलेल्या आरोपी मुलाचे नाव असून खुमराज बळीराम रहांगडाले ( वय ५५ रा. म्हसवानी) असे खून झालेल्या वडिलांचे नाव आहे.

Gondia murder case
Jalgaon | हरीविठ्ठल नगरात मध्यरात्री घरात घुसून महिलेवर अत्याचार, संशयिताला अटक

सडक अर्जुनी तालुक्यातील म्हसवानी येथील खुमराज बळीराम रहांगडाले ( वय ५५ रा. म्हसवानी) हे १३ ते १७ जून या कालावधीत मुलीची प्रकृती बरी नसल्याने तिच्याकरीता औषधी आणण्यासाठी दुचाकी (क्र. एम एच ३५/एआर ७९१९) ने खोडशिवनी येथे गेले असता खोडशिवनी ते म्हसवानी रस्त्याच्या कडेवर ते दुचाकीसह मृतावस्थेत आढळून आले होते. यावेळी त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत दिसून आली. परंतु अंधार असल्याने त्यांना झालेल्या जखमा स्पष्ट दिसुन येत नव्हत्या.

दरम्यान, दि.१४ जून २०२१ रोजी सडक अर्जुनी येथील वैद्यकिय अधिकारी यांनी मृतदेहाचे पोस्मार्टम दरम्यान मृताच्या कानाजवळ व डोक्यावर झालेल्या जखमा धारदार हत्याराने वार करुन झाल्या असल्याचे सांगितले. या आधारे मृताचा भाऊ फिर्यादी उदेलाल बळीराम राहांगडाले (वय ५२ रा. म्हसवानी) यांच्या तक्रारीवरून व प्राप्त शवविच्छेदन अहवालावरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी गुन्ह्यात खुनाचा कट रचणारा मुख्य सुत्रधार मृताचा मुलगा आरोपी निखील खुमराज रहांगडाले हा घटना झाल्यापासून गायब होता. तो बांग्लादेशात वास्तव्य करीत असल्याची माहिती समोर आली होती. या आरोपी मुलाला ताब्यात घेण्यासाठी आरोपीचा ब्युरो ऑफ इमेंग्रेशन ऑफीस येथून लुक आउँट सर्कुलर नोटीस काढण्यात आली. दरम्यान, हा आरोपी हा तीन वर्षानंतर बांग्लादेशातून भारतात इंदिरा गांधी विमानतळ येथे येऊन परत बांग्लादेशात जाण्याच्या तयारीत असताना त्याला इमेंग्रेशन ऑफीस नवी दिल्ली यांनी ताब्यात घेण्यात आले. याची माहिती डुग्गीपार पोलिसांना मिळताच तात्काळ डुग्गीपार पोलीस पथक नवी दिल्ली येथे रवाना झाले. त्यानंतर वडिलांचा खून केल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली.

Gondia murder case
Nashik Crime | कृषीनगर जॉगिंग ट्रॅकवर टोळक्याचा गोंधळ, नऊ जणांना अटक

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news