

गडचिरोली : राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी मंगळवारी (दि.२९) अहेरी विधानसभा क्षेत्रातून अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला.
शिवाय गडचिरोलीतून काँग्रेसचे मनोहर पोरेटी, भाजपचे विद्यमान आमदार डॉ.देवराव होळी यांनी अपक्ष, काँग्रेसचे विश्वजित कोवासे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून आपले अर्ज दाखल केले आहेत. आरमोरी विधानसभा क्षेत्रातून काँग्रेसचे रामदास मसराम, तसेच काँग्रेसचे माजी आमदार आनंदराव गेडाम यांनी अपक्ष आणि शिवसेनेचे माजी आमदार डॉ.रामकृष्ण मडावी यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.
अहेरी विधानसभा क्षेत्रातून आज १७ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्यासह मनसेचे संदीप कोरेत, काँग्रेसचे हनुमंतू मडावी यांनी अपक्ष, ऋषी पोरतेट(अपक्ष), नीता तलांडी(अपक्ष), बहुजन समाज पार्टीतर्फे रमेश गावडे यांच्यासह अन्य उमेदवारांनी १७ अर्ज दाखल केले.