Maharashtra Assembly Election | समरजीतसिंह घाटगेंचा उमेदवारी अर्ज दाखल

कागलमध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन
Maharashtra Assembly Election
Maharashtra Assembly Election | समरजीतसिंह घाटगेंचा उमेदवारी अर्ज दाखल file photo
Published on
Updated on

कागल : Maharashtra Assembly Election | शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजीत सिंह घाटगे (Samrajitsingh Ghatge) तसेच त्यांच्या पत्नी राजमाता जिजाऊ फाउंडेशनच्या अध्यक्षा नवोदिता घाटगे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. जोरदार शक्तीप्रदर्शन करत सकाळी पावणेअकरा वाजता त्यांनी आपले उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे दाखल केले.

यावेळी कागल शहरातील प्रमुख मार्गावरून जोरदार रॅली काढण्यात आली. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे झेंडे, टोप्या, बॅनरमुळे संपूर्ण शहर राष्ट्रवादीमय झाले होते. कार्यकर्त्यांच्या हातामध्ये असलेले विविध प्रकारचे बॅनरने लक्ष वेधून घेतले होते. यावेळी गोकुळ संघाचे माजी अध्यक्ष रणजीत सिंह पाटील, अखिलेश सिंह घाटगे, व्ही.बी.पाटील, भैय्या इंगळे, विजया निंबाळकर आदी उपस्थित होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news