Gadchiroli Protest | गडचिरोली जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा; किसान सभेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

धान, सोयाबीन, कापूस यासह खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान
Kisan Sabha   Collector Office Protest Gadchiroli
Kisan Sabha Collector Office Protest Gadchiroli Pudhari
Published on
Updated on

Kisan Sabha Collector Office Protest Gadchiroli

गडचिरोली : गडचिरोली जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, यासह विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभेच्या गडचिरोली जिल्हा शाखेच्या वतीने आज (दि.२३) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.

एल निनोच्या प्रभावामुळे महाराष्ट्रातील अनेक भागांत दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, धान, सोयाबीन, कापूस यासह खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा दावा किसान सभेने केला आहे. या पार्श्वभूमीवर किसान सभेने राज्यव्यापी आंदोलन पुकारले होते.

Kisan Sabha   Collector Office Protest Gadchiroli
Gadchiroli News | आश्रमशाळेतील सर्पदंशप्रकरणी फरार संस्था सचिव विश्वजित कोवासे यांना अटक!

गडचिरोली जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा, शेतकऱ्यांना प्रति हेक्टर ५० हजार रुपये मदत द्यावी, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांचे प्रोत्साहन अनुदान द्यावे, जाहीर केलेला बोनस तातडीने वितरित करावा आणि शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट भावाची हमी द्यावी, अशा मागण्या आंदोलकांनी केल्या.

तसेच वनजमिनींचे पट्टे देण्यात यावेत, वाघ व हत्तींच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपये मदत द्यावी आणि शेतकरी, शेतमजूर व कामगारांना पाच हजार रुपये मासिक पेन्शन द्यावी, अशी मागणीही करण्यात आली.

Kisan Sabha   Collector Office Protest Gadchiroli
Gadchiroli Crime | सुगंधित तंबाखूच्या अवैध उत्पादनावर गडचिरोली पोलिसांची कारवाई!

या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री यांना पाठविण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्व कॉम्रेड अमोल मारकवार, कॉम्रेड नाशिर हासमी, ऋषी प्रधान, परसराम आडे, राजू मडावी, ताज कुरेशी, हरिदास मोगरकर, राजू सातपुते, संदीप शेंडेसह अन्य कार्यकर्त्यांनी केले. आझाद समाज पक्षाचे राज बन्सोड आणि विनोद मडावी यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news