Gadchiroli ZP Recruitment Fraud | गडचिरोली जि.प.च्या आरोग्य विभागात नोकरीचा बनावट नियुक्ती आदेश देणाऱ्यास पोलिस कोठडी

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात शिपाई पदाच्या नोकरीसाठी उमेदवाराला बनावट नियुक्ती आदेश देणाऱ्या युवकास पोलिसांनी जेरबंद केले
Partnership Fraud
Partnership FraudPudhari
Published on
Updated on

Gadchiroli Fake Appointment Order

गडचिरोली : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात शिपाई पदाच्या नोकरीसाठी उमेदवाराला बनावट नियुक्ती आदेश देणाऱ्या युवकास पोलिसांनी जेरबंद केले आहे. राकेश मुनगेलवार, रा.गडचिरोली असे आरोपीचे नाव असून, न्यायालयाने त्यास चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

राकेश मुनगेलवार याने अनेक जणांना जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागांतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियानात शिपाई पदावर नोकरी देण्याचे आमिष दाखवून मोठी रक्कम वसूल केली. मुनगेलवार हा गरजू मुला-मुलींच्या पालकांना हेरुन त्यांच्याकडून पैसे वसूल करायचा आणि त्यांना बनावट नियुक्तीपत्र द्यायचा.

Partnership Fraud
Gadchiroli news : माओवादविरोधी कामगिरीची दखल: गडचिरोलीतील पाच सहायक पोलिस निरीक्षकांना वेगवर्धित पदोन्नती

आतापर्यंत त्याने ३ महिलांना ५ लाख ४० हजार रुपयांनी फसविल्याचे तपासात निष्पन्न झाले. शिवाय देवराव उराडे नामक इसमाचीही त्याने फसवणूक केली. सप्टेंबर २०२५ पासून त्याचा हा गोरखधंदा सुरू होता. गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगावच्या दोन महिलांकडून त्याने मोठी रक्कम उकळली.

त्यासाठी जिल्हा परिषदेत शिपाई पदाची बनावट जाहिरात तयार करून ती समाज माध्यमावर फिरवली. ही खरीखुरी जाहिरात असल्याचे समजून काही जण त्याच्या जाळ्यात अडकले. मात्र, एका उमेदवाराला दिलेले नियुक्तीपत्र बनावट असल्याचे लक्षात येताच फसवेगिरीचे बिंग फुटले.

Partnership Fraud
Gadchiroli News | जिल्हाधिकाऱ्यांचा बनावट आदेश बनविणाऱ्या आशिष पिपरेची तैलिक महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदावरुन हकालपट्टी

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी ती जाहिरात बोगस असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या वतीने पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. अखेर पोलिसांनी राकेश मुनगेलवार यास अटक केली. न्यायालयाने त्यास ९ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. या प्रकरणात आणखी कोणाकोणाचा सहभाग आहे, हे तपासाअंती निष्पन्न होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news