Gadchiroli news : माओवादविरोधी कामगिरीची दखल: गडचिरोलीतील पाच सहायक पोलिस निरीक्षकांना वेगवर्धित पदोन्नती

या पदोन्नतीमुळे दुर्गम भागातील पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढल्याचा उल्लेख पोलिस महासंचालक सदानंद दाते यांनी केला
Gadchiroli news : माओवादविरोधी कामगिरीची दखल: गडचिरोलीतील पाच सहायक पोलिस निरीक्षकांना वेगवर्धित पदोन्नती
Published on
Updated on

गडचिरोली : माओवादविरोधी अभियानात बजावलेल्या धाडसी आणि उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत गडचिरोली पोलिस दलातील पाच सहायक पोलिस निरीक्षकांना पोलिस निरीक्षकपदी वेगवर्धित पदोन्नती देण्यात आली आहे. शुक्रवारी मुंबई येथील पोलिस महासंचालक कार्यालयात आयोजित समारंभात पोलिस महासंचालक सदानंद दाते यांच्या हस्ते त्यांना ही पदोन्नती बहाल करण्यात आली.

Gadchiroli news : माओवादविरोधी कामगिरीची दखल: गडचिरोलीतील पाच सहायक पोलिस निरीक्षकांना वेगवर्धित पदोन्नती
Ahilyanagar Moharram Security: मोहरमपूर्वी पोलिसांची मोठी कारवाई; 432 जण तडीपार, शहरात कडक बंदोबस्त

पदोन्नती मिळालेल्या अधिकाऱ्यांमध्ये योगिराज जाधव, सचिन झनक, बाबासाहेब दुधाळ, सुनील बागल आणि राहुल देव्हडे यांचा समावेश आहे. गडचिरोलीसारख्या अतिसंवेदनशील आणि माओवादग्रस्त जिल्ह्यात प्रतिकूल परिस्थितीत धैर्य, शिस्त व कर्तव्यनिष्ठेने सेवा बजावल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला. पाचही सहायक पोलिस निरीक्षकांच्या खांद्यावर पोलिस निरीक्षकपदाची चिन्हे लावून त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी सदानंद दाते यांनी पदोन्नतीप्राप्त अधिकाऱ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या शौर्यपूर्ण कार्याचे कौतुक केले. या पदोन्नतीमुळे दुर्गम भागातील पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढून सेवेत गुणवत्ता, शौर्य आणि कर्तव्यनिष्ठेला अधिक बळ मिळत असल्याचे दाते म्हणाले.

Gadchiroli news : माओवादविरोधी कामगिरीची दखल: गडचिरोलीतील पाच सहायक पोलिस निरीक्षकांना वेगवर्धित पदोन्नती
Nanded Morcha | धम्मध्वज अवमान प्रकरणी हजारो बौद्ध अनुयायांचा लोहा तहसील कार्यालयावर मोर्चा

याप्रसंगी एटीएसचे अपर पोलिस महासंचालक नवल बजाज, कायदा व सुव्यवस्था विभागाचे अपर पोलिस महासंचालक डॉ.निखिल गुप्ता, राज्य गुप्तवार्ता विभागाचे आयुक्त शिरीष जैन, अपर पोलिस महासंचालक(सायबर) यशस्वी यादव, अपर पोलिस महासंचालक (विशेष कृती) डॉ.छेरिंग दोरजे, गडचिरोलीचे पोलिस अधीक्षक एम.रमेश यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.

Gadchiroli news : माओवादविरोधी कामगिरीची दखल: गडचिरोलीतील पाच सहायक पोलिस निरीक्षकांना वेगवर्धित पदोन्नती
Journalist Threat: पत्रकार धमकीप्रकरणी खा. संजय पाटील यांचा नोंदविला निषेध

गडचिरोली पोलिसांना आजवर मिळालेली पदके

गडचिरोली पोलिस दलाला आजपर्यंत ३ शौर्यचक्र, ६ राष्ट्रपती पोलिस शौर्य पदके, ३३८ पोलिस शौर्य पदके, २० राष्ट्रपती गुणवत्ता सेवा पदके, १,५१० पोलिस महासंचालक पदके तसेच ४०४ अधिकारी व कर्मचाऱ्यांना वेगवर्धित पदोन्नती मिळाल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news