KV School Approval Gadchiroli | गडचिरोलीत नवीन केंद्रीय विद्यालय सुरू करण्यास मान्यता: पहिले ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना प्रवेश

महिनाभरात प्रवेशप्रक्रिया पूर्ण करण्याचा प्रशासनाचा मानस
New Kendriya Vidyalaya Gadchiroli
New Kendriya Vidyalaya GadchiroliAI Photo
Published on
Updated on

New Kendriya Vidyalaya Gadchiroli

गडचिरोली : गडचिरोली येथे नवीन केंद्रीय विद्यालय सुरू करण्यास केंद्रीय विद्यालय संघटन मुख्यालायाने अधिकृत मंजुरी दिली आहे. चालू शैक्षणिक सत्रापासून हे विद्यालय प्रत्यक्ष सुरू होणार असून, त्यात इयत्ता पहिले ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. येत्या ३० दिवसांत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांनी दिली.

केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयांतर्गत असलेल्या केंद्रीय विद्यालय संघटनने याबाबतचा अधिकृत आदेश २ जुलै २०२६ रोजी जारी केला. मार्च २०१९ मध्ये मंजुरी मिळालेल्या देशातील ५० नवीन केंद्रीय विद्यालयांपैकी हे एक विद्यालय आहे.

New Kendriya Vidyalaya Gadchiroli
Gadchiroli news : माओवादविरोधी कामगिरीची दखल: गडचिरोलीतील पाच सहायक पोलिस निरीक्षकांना वेगवर्धित पदोन्नती

तात्पुरत्या इमारतीत भरणार शाळा

प्रायोजक प्राधिकरणाने विद्यालयासाठीची जागा केंद्रीय विद्यालय संघटनच्या नावे हस्तांतरित केली आहे. तसेच शाळेच्या तात्पुरत्या व्यवस्थापनासाठी इमारतही उपलब्ध करून दिली आहे. गडचिरोली येथील 'शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळा, सेमाना बायपास रोड येथे सध्या हे नवीन केंद्रीय विद्यालय सुरू केले जाणार आहे.

शिवाय गडचिरोली येथे तात्पुरत्या निवासासाठी आणि वर्गखोल्यांसाठी जिल्हा प्रशासनामार्फत काही खोल्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. शाळेच्या सुरुवातीच्या काळात विद्यार्थ्यांना कोणत्याही अडीअडचणी येऊ नयेत, यासाठी जिल्हा प्रशासन पूर्णपणे सहकार्य करत असल्याचे जिल्हाधिकारी अविशांत स्पष्ट केले.

New Kendriya Vidyalaya Gadchiroli
Gadchiroli hevay rain | गडचिरोलीत वीज कोसळून एकाचा मृत्यू, रपटा वाहून गेला, दोन ट्रक फसले!

पहिली ते पाचवीचे वर्ग

सुरुवातीला हे विद्यालय नागरी क्षेत्रांतर्गत इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंत सुरू होईल. त्यानंतर टप्प्याटप्प्याने पुढील वर्ग वाढवले जातील.जिल्हा यंत्रणेच्या संपूर्ण सहकार्याने प्रवेश प्रक्रिया आणि इतर कायदेशीर औपचारिकता पूर्ण केल्या जातील.

कायमस्वरूपी इमारतीचे कामही समांतरपणे होणार सुरू

विद्यालयाच्या तात्पुरत्या इमारतीमध्ये वर्ग सुरू होत असतानाच, दुसरीकडे केंद्रीय विद्यालयाच्या कायमस्वरूपी इमारतीचे बांधकामदेखील समांतरपणे सुरू करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी पंडा यांनी सांगितले. यामुळे विद्यार्थ्यांना भविष्यात सर्व सोयीसुविधांनी युक्त अशी हक्काची भव्य इमारत मिळणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news