Gadchiroli News | नगर परिषदेच्या स्पीपिंग मशिनचे आमदाराच्या कार्यालयापुढे लोकार्पण : नगराध्यक्ष, उपाध्यक्षांची दांडी

Gadchiroli Municipal Council | भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर
Gadchiroli  sweeping machine inauguration
Gadchiroli sweeping machine inaugurationPudhari
Published on
Updated on

Gadchiroli sweeping machine inauguration

गडचिरोली : लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड कंपनीने सीएसआर फंडातून गडचिरोली नगर परिषदेला दिलेल्या ऑटोमॅटीक स्वीपिंग मशिनचे लोकार्पण आज (दि. १२) नगर परिषद कार्यालयाऐवजी आमदारांच्या कार्यालयापुढे करण्यात आले. त्यामुळे नगराध्यक्षांसह उपाध्यक्षांनीही या कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले. यामुळे भाजपमधील अंतर्गत कलह पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

लॉयड्स मेटल्स अँड इंजिनिअरिंग कंपनीने सीएसआर फंडातून गडचिरोली शहरातील रस्त्यांची स्वच्छता करण्यासाठी नगर परिषदेला अलीकडेच स्वयंचलीत स्वीपिंग मशिन दिली आहे. या स्पीपिंग मशिनचे इंधन, चालकाचे वेतन आणि मशिन व्यवस्थापनाच्या खर्चाचा भार लॉयड्स मेटल्स कंपनी उचलणार आहे. नगर परिषद त्यावर केवळ देखरेख ठेवण्याचे काम करणार आहे. या मशिनचे लोकार्पण आज आ.डॉ.मिलिंद नरोटे यांच्या जनसंपर्क कार्यालयापुढे करण्यात आले.

Gadchiroli  sweeping machine inauguration
Gadchiroli News | मृत व्यक्तीच्या नावावरील शेतजमिनीतून रेतीचा अवैध उपसा

भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार अशोक नेते यांनी हिरवी झेंडी दाखवून या मशिनला मार्गस्थ केले. याप्रसंगी आ.डॉ.मिलिंद नरोटे, लॉयड्स मेटल्सचे उपाध्यक्ष श्री.नटराजन, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, माजी नगराध्यक्ष योगिता पिपरे, नगर परिषदेचे बांधकाम सभापती अनिल कुनघाडकर, आरोग्य व स्वच्छता सभापती मुक्तेश्वर काटवे, माजी नगरसेवक प्रमोद पिपरे, मुख्याधिकारी सूर्यकांत पिदूरकर तसेच अनेक नगरसेवक उपस्थित होते.

नगराध्यक्ष, उपाध्यक्ष गैरहजर

स्विपिंग मशिन लोकार्पण कार्यक्रमाला नवनिर्वाचित नगराध्यक्ष अॅड.प्रणोती निंबोकर व उपाध्यक्ष निखिल चरडे अनुपस्थित होते. स्विपिंग मशिन नगर परिषदेला मिळाली असताना नगर परिषद कार्यालयात तिचे लोकार्पण अपेक्षित होते. परंतु लोकार्पण माझ्याच कार्यालयात व्हावे, असा अट्टाहास आमदार डॉ.नरोटे यांनी धरल्याने आज ते त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात करण्यात आले. यामुळे नगराध्यक्ष व उपाध्यक्षांनी नाराज होऊन कार्यक्रमाकडे पाठ फिरविल्याची चर्चा आहे. यासंदर्भात नगराध्यक्ष अॅड.प्रणोती निंबोरकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी 'नगर परिषदेत अनेक नागरिक आपल्या समस्या घेऊन आले होते. त्या समस्यांचा निपटारा करताना उशीर झाल्याने आपण लोकार्पण कार्यक्रमाला जाऊ शकलो नाही,' असे सांगितले.

Gadchiroli  sweeping machine inauguration
Gadchiroli News | अडपल्लीच्या पोलाद प्रकल्पाला तीव्र विरोध; विशेष ग्रामसभेत गावकऱ्यांचा गदारोळ

माझ्या पाठपुराव्यामुळे मशिन मिळाली : आ.डॉ.नरोटे

स्वत:च्या जनसंपर्क कार्यालयापुढे स्वीपिंग मशिनचे लोकार्पण केल्यासंदर्भात आ.डॉ.मिलिंद नरोटे यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी मोबाईलवर संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. मात्र, लोकार्पण कार्यक्रमाबाबत त्यांनी एक प्रसिद्धीपत्रक जारी केले. मुंबईसारख्या मोठ्या शहरातील स्वच्छ रस्ते आणि तेथील कार्यप्रणाली पाहून गडचिरोलीतही जागतिक दर्जाच्या सोयी असाव्यात असा माझा ध्यास होता. त्याअनुषंगाने आपण लॉयड्स मेटल्स कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकांकडे विशेष पाठपुरावा केल्याने स्विपिंग मशिन मिळाली, असे त्यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news