Gadchiroli News | मृत व्यक्तीच्या नावावरील शेतजमिनीतून रेतीचा अवैध उपसा

सामाजिक कार्यकर्ते सूरज हजारे यांचे एसडीओ कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
SDO Office Protest Gadchiroli
सामाजिक कार्यकर्ते सूरज हजारे यांचे देसाईगंज येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन Pudhari
Published on
Updated on

SDO Office Protest Gadchiroli

गडचिरोली : आरमोरी तालुक्यातील करपडा चक येथील एका मृत व्यक्तीच्या नावावरील जमिनीचा नियमबाह्यरित्या पोटहिस्सा करुन रेतीघाटास परवानगी दिल्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते सूरज हजारे यांनी देसाईगंज येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन आरंभिले आहे.

यासंदर्भात सूरज हजारे यांनी वरिष्ठांकडे आधीच तक्रार केली आहे. परंतु महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करीत रेती उपसा करण्यास मंजुरी दिली. त्यामुळे हजारे यांनी ठिय्या आंदोलनाचे शस्त्र उगारले आहे. आरमोरी तालुक्यातील करपडा चक येथील सर्वे क्रमांक १५७/१ मधील ३.८८ हेक्टर जमिनीतून रेतीचा उपसा करण्यास प्रशासनाने मंजुरी दिली आहे.

SDO Office Protest Gadchiroli
Gadchiroli News | अडपल्लीच्या पोलाद प्रकल्पाला तीव्र विरोध; विशेष ग्रामसभेत गावकऱ्यांचा गदारोळ

ही जमीन मृत व्यक्तीच्या नावावर होती. परंतु नियमबाह्यरित्या त्या जमिनीचा पोटहिस्सा करुन ती ताब्यात घेण्यात आली. शिवाय पूर्वी तेथे भुईमुगाचे पीक घेतले जात होते. तसेच या जमिनीच्या क्षेत्रात ३७ हजार ब्रास रेती नसतानाही भूजल सर्वेक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी चुकीचा अहवाल दिला. भूमी अभिलेख विभागाने केलेल्या पावसाळ्यात सर्वेक्षणात वाळू असल्याचे नमूद केले, मात्र, फेर सर्वेक्षणात कोणतीही स्पष्ट नोंद करण्यात आली नाही, असे सूरज हजारे यांनी तक्रारीत म्हटले आहे.

या प्रकरणात वाळूमाफियांच्या दबावाखाली महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी निर्णय घेतल्याने संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांची भूमिका संशयास्पद वाटते. तक्रारकर्त्याला अंधारात ठेवून महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी रेती उपसा करण्यास दिलेली मंजुरी बेकायदेशिर असून, या प्रकरणाची चौकशी करुन दोषीवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सूरज हजारे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news