Gadchiroli Malaria Control | गडचिरोलीत हिवतापावर नियंत्रण; पॉझिटिव्हिटी दर ०.३२ टक्क्यांवर

१२ लाखांहून अधिक चाचण्या; सलग दोन महिने हिवतापामुळे शून्य मृत्यू
Gadchiroli Malaria Positivity Rate Drops
Gadchiroli Malaria Positivity Rate DropsPudhari
Published on: 
Updated on: 

Gadchiroli Malaria Positivity Rate Drops

गडचिरोली : जिल्ह्यात आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांमुळे हिवताप नियंत्रणात लक्षणीय यश मिळाल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. 

जानेवारी ते सप्टेंबर २०२६ या कालावधीत हिवतापाचा पॉझिटिव्हिटी दर ०.४९ टक्क्यांवरून ०.३२ टक्क्यांवर आला असून, बाधितांची संख्या मागील वर्षातील ६ हजार ४११ वरून ३ हजार ९४० पर्यंत घटली आहे. 

जानेवारी ते सप्टेंबरदरम्यान जिल्ह्यात १२ लाख १९ हजार ७८३ हिवताप चाचण्या करण्यात आल्या. यामध्ये ५ लाख ७ हजार ६७५ रक्त नमुन्यांची सूक्ष्मदर्शक तपासणी, तर ७ लाख १२ हजार १०८ जलद निदान चाचण्यांचा समावेश आहे. वार्षिक परजीवी निर्देशांकही मागील वर्षातील ६.४२ वरून ४.६२ पर्यंत खाली आला आहे. २०२६ मध्ये जुलै अखेरपर्यंत हिवतापामुळे सहा मृत्यूंची नोंद झाली. मात्र,  ऑगस्ट आणि सप्टेंबर या सलग दोन महिन्यांत हिवतापामुळे एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही.

Gadchiroli Malaria Positivity Rate Drops
Gadchiroli News | नीती आयोगाच्या डेल्टा रँकिंगमध्ये गडचिरोली देशात प्रथम

डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अतिजोखमीच्या १ हजार १९५ गावांतील १ लाख ६० हजार ९५६ घरांमध्ये कीटकनाशक फवारणी करण्यात आली. तसेच १ लाख १६ हजार ३७२ कीटकनाशक प्रक्रिया केलेल्या मच्छरदाण्यांचे वाटप करण्यात आले, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली. 

जिल्ह्यातील १५० आश्रमशाळांमधील ३९ हजार ६६३ विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली. बाधित आढळलेल्या ३७१ विद्यार्थ्यांवर उपचार करण्यात आले. उपचार पूर्ण करणाऱ्या ५६६ रुग्णांना प्रत्येकी ५०० रुपये याप्रमाणे एकूण २ लाख ८३ हजार रुपये बुडित मजुरी देण्यात आली

Gadchiroli Malaria Positivity Rate Drops
Gadchiroli News : मसेलीच्या आश्रमशाळेतून मध्यरात्री दोन विद्यार्थिनी बेपत्ता!

जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी आरोग्य यंत्रणेच्या प्रयत्नांचे कौतुक केले. नागरिकांनी मच्छरदाणीचा वापर करावा, परिसरात पाणी साचू देऊ नये आणि ताप आल्यास तातडीने रक्त तपासणी करून पूर्ण उपचार घ्यावेत, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news