Gadchiroli Crime | कुरखेड्यात १९ गोवंश जनावरांसह १९ लाख ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त

अवैध गोवंश वाहतुकीवर पोलिसांची कारवाई
Kurkheda Cattle Rescue
Kurkheda Cattle Rescue Pudhari
Published on
Updated on

Kurkheda Cattle Rescue

गडचिरोली : कुरखेडा तालुक्यात अवैधरित्या गोवंशाची वाहतूक करणाऱ्या दोन वाहनांवर स्थानिक गुन्हे शाखा आणि कुरखेडा पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत १९ गोवंशीय जनावरे, ट्रक आणि बोलेरो पिकअप अशा दोन वाहनांसह एकूण १९ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी दोन आरोपींविरुद्ध कुरखेडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांना २४ ऑगस्टच्या रात्री गेवर्धा ते केशोरी मार्गावर दोन वाहनांमधून अवैधरित्या गोवंशाची वाहतूक केली जाणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा व कुरखेडा पोलिसांच्या पथकाने गेवर्धा गावाजवळ सापळा रचला. यावेळी संशयास्पदरीत्या येणाऱ्या ट्रक व बोलेरो पिकअपला अडवून तपासणी केली असता, दोन्ही वाहनांमध्ये गोवंशीय जनावरे अत्यंत निर्दयपणे कोंबून भरल्याचे आढळून आले. वाहतुकीसाठी आवश्यक परवानाही आरोपींकडे आढळला नाही.

Kurkheda Cattle Rescue
Gadchiroli Crime | नांगपूरच्या जंगलात जुगार अड्ड्यावर छापा; ३६ जणांवर गुन्हा!

ट्रक क्रमांक टीजी १२ यू ४८९६ मध्ये ११ गायी व दोन बैल, तर महिंद्रा बोलेरो पिकअप क्रमांक एमएच ३५ एजे ४६०१ मध्ये चार गायी व दोन बैल आढळून आले. या १९ जनावरांची किंमत सुमारे २ लाख ६५ हजार रुपये आहे. याशिवाय १२ लाख रुपये किमतीचा ट्रक आणि पाच लाख रुपये किमतीची बोलेरो पिकअप जप्त करण्यात आली.

या प्रकरणी शेख इब्राहिम शेख इस्माईल (४०, रा. नागपूर) आणि मुफस्सील कुरेशी मोहम्मद जमील कुरेशी (२५, रा.नागपूर) यांच्याविरुद्ध प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम, महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम तसेच भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Kurkheda Cattle Rescue
Gadchiroli Crime : अल्पवयीन मुलीचा विनयभंग; आरोपीला ३ वर्षांच्या कारावासासह १० हजाराचा दंड

ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या आदेशानुसार अपर पोलिस अधीक्षक कार्तिक मधिरा, अपर पोलिस अधीक्षक गोकुल राज.जी आणि उपविभागीय पोलिस अधिकारी प्रमोद मडामे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अरुण फेगडे व कुरखेडा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अजय जगताप यांच्या नेतृत्वाखाली पथकाने ही कारवाई केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news