Gadchiroli Crime | नांगपूरच्या जंगलात जुगार अड्ड्यावर छापा; ३६ जणांवर गुन्हा!

२३ चारचाकी, ५ दुचाकींसह १ कोटी ५० लाखांचा मुद्देमाल जप्त
Gadchiroli Crime | नांगपूरच्या जंगलात जुगार अड्ड्यावर छापा; ३६ जणांवर गुन्हा!
Gadchiroli Crime | नांगपूरच्या जंगलात जुगार अड्ड्यावर छापा; ३६ जणांवर गुन्हा!
Published on
Updated on

गडचिरोली : कोरची तालुक्यातील नांगपूर परिसरातील जंगलात सुरू असलेल्या अवैध जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखा आणि कोटगुल पोलिसांनी छापा टाकून ३४ जणांना ताब्यात घेतले. या कारवाईत रोख रकमेसह २३ चारचाकी, पाच दुचाकी आणि जुगाराचे साहित्य असा एकूण १ कोटी ५० लाख ९७ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

नांगपूर येथील जंगल परिसरात ताशाच्या पत्त्यांवर पैशांची बाजी लावून जुगार सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सोमवारी पहाटे २ वाजताच्या सुमारास घटनास्थळी छापा टाकला. पोलिसांची चाहूल लागताच काही जणांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी कारवाई करत ३४ जणांना ताब्यात घेतले.

ताब्यात घेतलेल्या आरोपींकडून ४ लाख ४१ हजार ५०० रुपये रोख, २३ चारचाकी, पाच दुचाकी, ताशांचे पत्ते, स्टीलची पेटी, बॅटरी आणि ताडपत्री असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चौकशीदरम्यान ताब्यात घेतलेल्या आरोपींनी परमेश्वर लोहंबरे (रा.नांगपूर) आणि मिथुन तांबेकर (रा.कोटगुल) यांच्या सांगण्यावरून जुगार खेळण्यासाठी आल्याचे पोलिसांना सांगितले. या दोघांसह एकूण ३६ आरोपींविरुद्ध कोटगुल पोलिस ठाण्यात महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोहंबरे आणि तांबेकर हे सध्या फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.

ही कारवाई पोलिस अधीक्षक एम.रमेश यांच्या आदेशानुसार अपर पोलिस अधीक्षक कार्तिक मधिरा, अपर पोलिस अधीक्षक गोकुल राज जी., उपविभागीय पोलिस अधिकारी प्रमोद मडामे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अरुण फेगडे, सहायक पोलिस निरीक्षक भगतसिंह दुल्हत, हवालदार सतीश कत्तीवार, तुषार खोब्रागडे, बापू कुम्मरी, कोटगूल पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक विवेक वायकर, सहायक फौजदार भजनराव कोडापे, अंमलदार संदीप बागडे व किेशोर बावणे यांनी केली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक विवेक वायकर करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news